Monday 27 June 2016

येत्‍या 30 जून पर्यंत सर्व शेतकक-यांना पिककर्ज वाटप करा
-         किशोर तिवारी
Ø  27 हजार शेतक-यांना 291 कोटीचे कर्ज वाटप
Ø  पिक कर्जा बाबत प्रत्‍येक बँकेत फलक लावा
Ø  बँकेत शेतक-यांचा अपमान होणार नाही
Ø  शेवटच्‍या शेतक-यापर्यंत कर्ज वाटप करा
Ø  30 जून पर्यंत 700 कोटीचे कर्ज वाटप करा

वर्धा,दि.16-अडचणीत सापडलेल्‍या शेतक-यांना पिककर्ज वाटप करतांना सर्व बँकानी सकारात्‍मक भूमिका घेऊन जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना पिक कर्ज उपलब्‍ध करुन देतांनाच बँकेत येणा-या शेतक-यांना अपमानास्‍पद वागणूक मिळणार नाही याची खबरदारी घ्‍या अशा सुचना वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
शेतक-यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटपासंदर्भात राष्‍ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध विभाग प्रमुख यांची संयुक्‍त बैठक आयो‍जित करण्‍यात आली होती. त्‍या प्रसंगी मार्गदर्शन करतांना किशोर तिवारी बोलत होते.
यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, मुख्‍य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्‍हा भाजपा अध्‍यक्ष राजेश बकाने, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलींद भेंडे तसेच जिल्‍हाअधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, अग्रणी बँक प्रबंधक  विजय जांगडा, निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नवाडकर आदी उपस्थित होते.
शेतक-यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज देतांना खाजगी  सावकाराकडे जाण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही याची खबरदारी घेण्‍याच्‍या सुचना करतांना किशोर तिवारी म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80 टक्‍के पेक्षा जास्‍त शेतकरी कृषी कर्जा अंतर्गंत यावे यासाठी अडीच लाख रुपयापर्यंतच्‍या कर्जासाठी मुद्रांक शुल्‍क माफ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्ज पुनर्गठणाची सुविधा असल्‍यामुळे अद्याप कर्ज न घेतलेले व ज्‍याना कर्ज हवे आहे अशा सर्व शेतकरी खातेदाराणा कर्ज उपलब्‍ध करुन द्या असे निर्देश बँकेच्‍या सर्व वरिष्‍ठ अधिका-यांना दिले.
पिक कर्ज वाटपाचे उद्ष्टिय ठरवून दिले असले तरी कर्ज मागणीसाठी येणा-या प्रत्‍येक शेतक-यांना कर्ज मिळेपर्यंत अर्ज वाटप सुरू ठेवा यासाठी कमीत कमी वेळात व तात्‍काळ कर्ज मिळेल अशी पध्‍दत लागू करा. जिल्‍हयात कर्ज वाटपामध्‍ये दिरंगाई करणा-या बँकाच्‍या व्‍यवस्‍थापका विरुध्‍द कारवाई करण्‍याचे निर्देशही यावेळी दिलेत.
शासकीय अनुदान कपात करु नका
शेतक-यांना मिळणा-या अनुदानातून कर्ज वसूली केली आहे अशा शेतक-यांना तात्काळ वसूल केलेली रक्‍कम संबंधीत शेतक-यांच्‍या खात्‍यात वळती करा.यापूढे शासकीय अनुदान कर्ज खात्‍यात वळते करू नका अशा स्‍पष्‍ट सूचना यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍यात.
पिक कर्जा संदर्भात आलेल्‍या शेतक-यांच्‍या तक्रारीची दखल घेतांना ते पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक बँकानी पिक कर्ज वाटप सुरू आहे. या संदर्भात ठळकपणे दिशेल असे बोंर्ड लावून त्‍यावर शाखा व्‍यवस्‍थापका सर्व प्रमुख दुरध्‍वनी शेतक-यांसाठी उपलब्‍ध करून दयावे असेही त्‍यांनी सांगितले.
            बँकानी कर्ज पुरवठा करतांना शेतकरी कर्जासाठी बँकेत येतील याची वाट न पाहता प्रत्‍येक गावातील शेतकरी सदस्‍याची यादी नूसार प्रथम कर्ज घेणा-या शेतक-यांना बँकेच्‍या कक्षेत आणून त्‍यांना प्राधान्‍याने कर्ज पुरवठा करावा बॅंकानी यापूढे शेतक-यांच्‍या घरापर्यंत जावून पिक कर्ज उपल्‍ब्‍ध करुन देण्‍याची भूमिका घ्‍यावी असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी  शैलेश नवाल यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविक भाषणात जिल्‍हयात 4 हजार 377 शेतकरी सदस्‍याचे 45 कोटी रुपयाच्‍या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. 27 हजार 277 शेतक-यांना 291 कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले असून येत्‍या सात दिवसात 100 कोटीचे कर्ज वाटप पूर्ण होईल. 30 जून पर्यंत सरासरी 700 कोटीचे कर्ज वाटप पूर्ण करून जिल्‍हयात 80 टक्‍के पेक्षा जास्‍त शेतक-यांना पिक कर्ज उपलब्‍ध होईल यासाठी प्रत्‍येक बँकानी सुट्टीच्‍या दिवसीही बँका सुरू ठेवून कर्ज वाटप करावे.
            कर्ज वाटपासाठी आवश्‍यक असलेले सातबारा आठ अ तसेच आवश्‍यक दस्‍ताऐवज उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. कर्ज पूरवठा संदर्भात तहसीलदारानी नियमित आढावा घेऊन प्रत्‍येक बँकनिहाय माहिती घ्‍यावी असेही त्‍यांनी सांगितले.
अग्रणी बँक प्रबंधक विजय जांगडा यांनी बँकनिहाय कर्ज वितरणा संदर्भात दिलेले उद्ष्ट्यि व झालेल्‍या कार्यवाही संदर्भात माहिती दिली.
0000
             
 

No comments:

Post a Comment