Monday 27 June 2016

शहिदांचा राज्‍याला व देशाला अभिमान- मुख्‍यमंत्री
Ø काळजी करु नका, सरकार आपल्‍या पाठीशी
Øमुखमंत्रयांचा शहीदांच्‍या कुंटुबियांना दिला धीर
Ø व्हिडिओ कॉन्‍फरसिंगने साधला संवाद
Ø मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेश वाटप

वर्धा दि.3 – पुलगाव येथील घटना दुखद असून या घटनेत ज्‍या कुंटूबांनी आपला आधार गमावला त्‍या सर्वाच्‍या पाठीशी शासन ठामपणे उभे असून पुलगाव घटनेत शहिद झालेले व्‍यक्‍ती देशासाठी कार्य करतांना शहिद झाले आहेत. शहिदांच्‍या वारसांना  मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने  मदत करण्‍यात येत असून ही मदत व्‍यक्‍ती पेक्षा मोठी नसून शहिदांचा राज्‍याला व देशाला अभिमान आहे, अशा शब्‍दात  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. आज मुख्‍यमंत्री यांनी पुलगाव घटनेतील शहीद व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबियासोबत व्हिडिओ कॉन्‍फरसिंगव्‍दारे  साधला संवाद साधला.
जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे मुख्‍यमंत्री सहाय्यत निधीतून धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता.  यावेळी खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे, आमदार  डॉ. पंकज  भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्‍हाधिकारी शिरीष  पांडे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, केंद्रीय दारुगोळा भांडारच्‍या ज्‍योती गुळवे, तहसिलदार राहूल सारंग  व शहिद व्‍यक्‍तींचे कुंटूंबिय उपस्थित होते.

केंद्रीय दारुगोळा भांडार, पुलगाव येथील घटनेत 19 व्‍यक्‍ती शहिद झाले असून 17 जखमी झाले आहेत. मुख्‍यमंत्री सहायता निधीमधून घोषित केलेली सर्व रक्‍कम जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाली असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले. या घटनेत शहिद झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींच्‍या कुंटूबियांना  1 लाख रुपये तातडीची मदत मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून घोषित करण्‍यात आली होती. रण्‍यात ंच्‍या ातेवातेवाईकांना शहिद 19 व्‍यक्‍ती पैकी 13 व्‍यक्‍तीच्‍या वारसांना  तर जखमीपैकी 13 व्‍यक्‍तीच्‍या  कुंटूबियांना  ही मदत आज धनादेशाव्‍दारे वाटप करण्‍यात आली. शहिद सहा व्‍यक्‍तींची ओळख पटली नसून ओळख पटताच तात्‍काळ त्‍यांच्‍या वारसांना मदत देण्‍यात येईल असे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
शहिद अमित दांडेकर यांच्‍या पत्‍नी प्राची दांडेकर यांनी मुख्‍यमंत्र्यांशी संवाद साधला. माझे पती शहिद झाले, अमर झाले, त्‍यांचा मला अभिमान आहे, अशा शब्‍दात प्राची दांडेकर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. सरकार आपल्‍या पाठीशी आहे काळजी करु नका असा धीर  मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिला. आज आणि भविष्‍यात आपल्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी सरकार आपल्‍या पाठीशी असल्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री यांनी दिली.
मुबंई येथून व्हिडिओ कॉन्‍फरसिंगव्‍दारे  संवाद साधतांना पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आजूबाजूच्‍या   पाच गावात आरोग्‍य शिबिर घेण्‍यात आले असून याचा लाभ 114 रुग्‍नांनी  घेतला आहे. पुलगावला तसेच केंद्रीय दारुगोळा भांडाराकडे जाणारे सर्व रस्‍ते उत्‍तम करण्‍यात येतील असेही त्‍यांनी सांगितले. पुलगाव पंचायत समितीला अग्निशमन यंत्र देण्‍यासंदर्भात प्रस्‍ताव पाठविण्‍याचे सांगितले असल्‍याचे पालकमंत्री म्‍हणाले.
      शहिद व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबातील व्‍यक्‍तीला प्राधान्‍याने नौकरी देण्‍या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्‍याचे पालकमंत्री यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे शहिद व जखमी व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबियांच्‍या सर्व समस्‍या लिहून घ्‍या अशा सुचना जिल्‍हाधिकारी यांना दिल्‍या. या समस्‍या तातडिने सोडविण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. 
      पुलगाव घटनेत शहिद झालेल्‍यामध्‍ये  के.मनोज कुमार, नवज्‍योत सिंग, धर्मेद्र के. यादव, अमित महादेव दांडेकर, प्रमोद महादेवराव मेश्राम, बालु पांडुरंग पाखरे, धनराज प्रभाकर मेश्राम, रनसिंग मिरसिंग, रामचंद्र, सत्‍यप्रकाश सिंग, अमित पुनिया सिंग, क्रिष्‍ण कुमार, शेखर गंगाधर बालसकर, कुलदिप सिंग, आर.एस. पवार, अरविंद कुमार सिंग, सतिश उमराव सिंग , लिलाधर बापुराव चोपडे यांचा समावेश आहे.
 जखमीमध्‍ये नेत्रपाल सिंग, लोकेश श्रीकृष्‍ण , राजेंद्र महाजन, स्‍वप्‍नील रमेश खुरगे, बच्‍चन सिंग , ललित कुमार, दिपक अर्जुन शिंदे, प्रदिप कुमार मुन्‍शीराम, संतोष पाटील, एस. त्रिपाठी, शरद यादव, जगदिश चंद्र, राम नामदेवराव वनकर , सतिश शालीकरामजी गवारकर, किशोर मोतीलाल साहू, धनेंद्र सिंग, सयाज कुमार यांचा समावेश आहे.

                                                       00000

No comments:

Post a Comment