Monday 27 June 2016

एक मुल एक वृक्ष ही संकल्‍पना राबवणार
-नयना गुंडे
·         वृक्षलागवड मोहिमेत जिल्हा परिषदेचा  पुढाकार
·         1 लक्ष 60 हजार वृक्ष लावण्‍याचे नियोजन
·         शाळा व महाविद्यालयाचा सहभाग

वर्धा,दि 13- दोनकोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्‍हा परिषदेतर्फे एक लक्ष 60 हजार वृक्ष लावण्‍याचे नियोजन पुर्ण करण्‍यात आले आहे. शहरातील व जिल्‍हयातील शाळामध्‍ये एक मुल एक वृक्ष या संकल्‍पणेमध्‍ये सर्व शाळाना सहभागी करुण घेण्‍यात येणार असल्‍याची माहि‍ती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.
जिल्‍हयात 1 जुलै रोजी एकाच दिवशी दोनकोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्‍यात येत असून जिल्‍हा परिषदेतर्फे वृक्षलागवड  मो‍हिमेसाठी केलेल्‍या नियोजनाबद्दल माहिती देतांना श्रीमती नयना गुंडे बोलत होत्‍या .
            वृक्षलागवड मोहिमेत जिल्‍हा परिषदेतील सर्वच विभाग सहभागी होत असून प्रत्‍येक विभागांना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या जागेनुसार वृक्षारोपण करण्‍यासंदर्भात उद्दिष्‍ट्य देण्‍यात आल्‍याचे सांगतांना श्रीमती नयना गुंडे म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागात ग्रामपंचायतनिहाय वृक्षारोपण  मोहिम यशस्‍वी करण्‍यासाठी गट विकास अधिकारी यांनी नियोजन केले आहे.409 ग्रामपंचायत क्षेत्रात 1 लक्ष 53 हजार 300 वृक्ष लावण्‍याचे घ्‍येय ठरविण्‍यात आले असून त्‍यापैकी 52 हजार 300 वृक्षखंड्डे तयार झाले आहेत.
जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र प‍रिसरात 210 जागाची निवड केली असून 2 हजार 740 वृक्ष लावण्‍याचा संकल्‍प केला आहे. यापैकी 2 हजार वृक्षखंड्डे तयार करण्‍यात आले आहेत. सिंचन विभागातर्फे 4 हजार 400 वृक्ष लागवडीची तयारी पुर्ण झाली आहे.
जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण भागातील सर्व रस्‍त्‍यांच्‍या दूतर्फा वृक्ष लावुन हरित पट्टा  निर्माण करण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. त्‍यानूसार वृक्षलागवड मोहिमेची तयारी सुरु असल्‍याचेही श्रीमती नयना गुंडे यांनी सांगितले.
            पंचायत समिती व गावनिहाय वृक्षरोपन मोहिमेमध्‍ये दिनांक 1 जुलै रोजी प्रत्‍यक्ष वृक्षरोपन करण्‍यासाठी दिलेल्‍या उद्दिष्‍ट्याप्रमाणे आर्वी 60 गावे 8 हजार 450 वृक्ष, आष्‍टी 41 गावे 17 हजार 900 वृक्ष, देवळी 63 गावे 16 हजार 200 वृक्ष,हिंगणघाट 31 गावे 10 हजार 700 वृक्ष, कारंजा 38 गावे 7 हजार 500 वृक्ष,समुद्रपूर 69 गावे 24 हजार 50 वृक्ष,सेलु 61 गावे 13 हजार 500 वृक्ष, तर वर्धा तालुक्‍यातील 39 गावात 55 हजार वृक्ष लावण्‍याचे उद्दिष्‍ट्य देण्‍यात आले असून प्रत्‍यक्ष वृक्षारोपन मोहिमेची पूर्ण तयारी सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
एक मूल एक वृक्ष
जिल्‍हयातील सर्व प्राथमिक, माध्‍यमिक तसेच हायस्‍कूल स्‍तरावरील शाळांमध्‍ये वृक्षलागवड मोहिमे बद्दल जागृती निर्माण करण्‍यात येत असून मुख्‍याध्‍यापकांनी एक मुल एक वृक्ष ही संकल्‍पना प्रत्‍यक्ष राबवून वृक्षरोपण मोहिम यशस्‍वी करावी अशा सूचना देण्‍यात आल्‍याची माहिती मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी दिल्‍या आहेत.
जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळामध्‍ये ही मोहिम राबवि‍तांनाच सर्व खाजगी शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी या मोहिमेत सहभागी होवून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी  एक वृक्ष आपल्‍या घरी लावावे व त्‍याचे संगोपन करून ते जगवावे यासाठी पुढाकार घ्‍यावा शाळाच्‍या परिसरात दिनांक 1 जुलै रोजी सर्व शिक्षक व पदाधिका-यांनी वृक्षलागवड मोहिम राबवून शाळेचा परिसर हिरवा करावा असे आवाहन करण्‍यात आल्‍याचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी केले आहे.
वृक्षलागवड मोहिमेत विविध शैक्षणिक संस्‍था तसेच पर्यावरण व वृक्ष रोपनक्षेत्रात निसर्ग सेवा समिती सह विविध संस्‍था रोटरी लायन तसेच विविध संघटनांनी पुढाकार करुन ही मोहिम यशस्‍वी करावी असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment