Saturday 18 February 2012

स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत निर्मल स्‍वराज्‍य मोहिम


     वर्धा, दि. 18-राज्‍यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानास गती देण्‍यासाठी निर्मल स्‍वराज्‍य मोहिम राबविण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असून, वर्धा जिल्‍ह्यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाच्‍या  वतीने जिल्‍ह्यात ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. येत्‍या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी या मोहिमेचा शुभारंभ जिल्‍हास्‍तरावरुन करण्‍यात येणार आहे. तसेच तालुकास्‍तर व ग्रामपंचायत स्‍तरावरुनही निर्मल स्‍वराज्‍य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
     राज्‍यात स्‍वच्‍छतेची लोकचळवळ निर्माण करण्‍यासाठी केंद्र शासन पुरस्‍कृत मागणी आधारित व लोकसहभागाच्‍या तत्‍वावर  संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान राज्‍यातील 33 जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यातही या अभियानाच्‍या  यशस्‍वी अंमलबजावणी करीता जिल्‍हा  प्रशासन कार्यरत असुन, जिलह्यात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती सन 2003 मध्‍ये 33 टक्‍के होती ती आता 84 टक्‍के पर्यंत पोहचली आहे. राज्‍याच्‍या  सुवर्ण महोत्‍सवानिमित्‍य जिल्‍ह्यात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्‍यात आली असून, निर्मल महाराष्‍ट्राचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी स्‍वच्‍छतेची ही लोकचळवळ अधिक बळकट करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरीता 19 फेब्रुवारी 2012 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनाचे औचित्‍य साधून निर्मल स्‍वराज्‍य मोहीम राबविण्‍याचा निर्णय शासनाने मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही घेतलेला आहे. या मोहीमेचा समारोप दिनांक 14 एप्रिल 2011 रेाजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी करण्‍यात येणार आहे.
     या मोहीमे दरम्‍यान 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती, 8 मार्च जागतीक महिला दिन, 22 मार्च जागतिक जल दिन व 7 एप्रिल जागतिक आरोग्‍य दिन विशेषांचे औचित्‍य साधून वेगवेगळे कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहे. मोहिमे दरम्‍यान स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती 70 टक्‍के पेक्षा कमी असलेल्‍या  ग्रामपंचायतीमध्‍ये वैयक्तिकशौचालयाची वाढ करुन प्रत्‍येक तालुक्‍यातील किमान 20 ग्रामपंचायतीची निवड करुन 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त करणे, ज्‍या ग्रामपंचायतीची स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती 70 टक्‍के असेल त्‍या ग्रामपंचायती 100 टक्‍के हागणदारी मुक्‍त करणे व त्‍या व्‍यतीरिक्‍त सर्व ग्रामपंचायतीची स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती किमान 70 टक्‍के पर्यंत
                                                ..2..
                             ..2..
आणने, दि. 18 नोव्‍हेंबर 2011 रोजीच्‍या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय व नवबौध्‍द  यांच्‍या कुटूंबाकडे वैयक्‍तीक शौचालय उपलब्‍ध  होईल हे पाहणे, केंद्र सरुकारच्‍या  सुचनेप्रमाणे महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी अधिनियम व संपूर्ण स्‍वच्‍छता  अभियानाच्‍या  प्रभावी समन्‍वयाव्‍दारे अंमलबजावणी करणे, सर्व शाळा व अंगणवाडी मध्‍ये स्‍वच्‍छतागृह उपलब्‍ध  करुन दणे, सर्व माध्‍यमिक शाळा, आश्रमशाळा व शासकीय कार्यालयामध्‍ये स्‍वच्‍छतागृह उपलब्‍ध असल्‍याची खात्री करणे, वार्षिक अंमलबजावणी आराखड्यानुसार भौतीक व आर्थिक उद्दिष्‍टे साध्‍य करणे, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाबाबत जनजागृती करणे, इत्‍यादी उदिृदष्‍टे ठरविण्‍यात आलेले आहे.
     मोहिमेच्‍या प्रभावी अंमलबजावणीकरीता ज्‍या गावाची निवड मोहिमेकरीता करण्‍यात येणार आहे त्‍यामध्‍ये गवंडी प्रशिक्षण मोहिम काळात जिल्‍हास्‍तर, तालुकास्‍तर तसेच ग्रामस्‍तरावर विशेष दिनाचे आयोजन करणे तसेच स्‍वच्‍छतेविषयक मोठ्या प्रमाणात जनजागृती व्‍हावी यासाठी विविध घटकांच्‍या कार्यशाळा, रथयात्रा, कलापथक, पथनाट्य, किर्तनकार , प्रबोधनकार यांचे कार्यक्रम इ. जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
      मोहिम कालावधीत 200-300 शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्‍त केलेल्‍या ग्रामपंचायतीला रुपये 5000, गौरवपत्र व स्‍मृतीचिनह देवून गौरविण्‍यात येणार आहे. 300-500 पर्यंत शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्‍त केल्‍यास रु. 25,000 , गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. मोहिम कालावधीत ज्‍या पंचायत समितीमधील 20 किंवा त्‍यापेक्षा अधिक गावे हागणदारीमुक्‍त करतील त्‍या पंचायत समितींना रु. 25,000, गौरवपत्र, स्‍मृतीचिनह देवून गौरविण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या जिल्‍ह्यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त गावे हागणदारीमुक्‍त होतील अश्‍या जिल्‍ह्यांना प्रथम क्रमांक रु. 50,000, व्दितीय क्रमांक रु. 25,000, तृतीय क्रमांक रु. 10,000 तसेच गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. मोहिमेमध्‍ये उत्‍कृष्‍ट काम केलेल्‍या  100 टक्‍के हागणदारीमुक्‍त झालेल्‍या ग्रामपंचायतीचा गौरव दिनांक 1 मे 2012 रोजी महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांचे हस्‍ते गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. अशी माहिती जि.प. मुख्‍यकार्यपालन अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी दिली.

No comments:

Post a Comment