Monday 13 February 2012

हिंदनगर येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.13-राष्‍ट्रीय  ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी आरोग्‍य केंद्र 1 सानेवाडी अंतर्गत हिंदनगर येथील अंगनवाडी क्रमांक 19 येथे दिनांक(7 फेब्रुवारी 2012 रोज मंगळवारला) नुकतेच समतोल पोषक आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी नगरसेविका कुत्‍तरमारे, प्रमुख अतिथी माजी मुख्‍याध्‍यापक भगत तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. शिल्‍पा वानखेडे उपस्थित होत्‍या. श्रीमती कुत्‍तरमारे यांनी डॉ.आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला हारार्पण करुन दिपप्रज्‍वलन केले. डॉ. वानखेडे यांनी प्रास्‍ताविक भाशणामध्‍ये ज्‍या आहारामधुन विटॅमिन, मिनरल, प्रोटीन, कार्बोहायड्रेटस मिळतात तसे समतोल आहार आहे. तसेच या विटॅमिनचे प्रकार व त्‍यांच्‍या अभावी होणारे आजार याविषयी विस्‍तृत माहिती दिली.
     यावेळी बोलताना भगत म्‍हणाले की मुर्तीकार मातीला आकार देऊन मुर्ती घडवितो त्‍याचप्रमाणे समतोल आहाराव्‍दारे आईने मुलाला सुदृढ बनविले पाहजे. कार्यक्रमाचे शेवटी अंगणवाडीच्‍या मुलींनी नृत्‍य सादर केले. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका नम्रता, ए.एन.एम. अर्चना भुरे, विलास भुरे व लिंक वर्कर्स आदिंनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
                             00000



No comments:

Post a Comment