Monday 13 February 2012

वर्धेत रोग निदान व आरोग्‍य मार्गदर्शन शिबीर


    वर्धा,दि.13- वर्धा नागरी परीसरामध्‍ये राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान, नागरी प्रजनन व माता बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत नागरी आरोग्‍य केंद्र सानेवाडी व पुलफैल येथे रोग निदान व आरोग्‍य मार्गदर्शन शिबीराचे आयेाजन करण्‍यात येत आहे.
     या आरोग्‍य शिबीरामध्‍ये नामांकित तज्ञ डॉक्‍टरांकडून गरोदर मातांची व बालकांची तसेच दंत रोग, अस्थिरोग, त्‍वचारोग विषयक रोगांची तपासणी करण्‍यात येईल. किशोरवयीन मुलामुलींची रक्‍तगट व हिमोग्‍लोबिन तपासणी, लसीकरण, बाळाची काळजी घेणे, जननी शिशुसुरक्षा योजना व कुटुंब कल्‍याण कार्यक्रम विषयी मार्गदर्शन व सल्‍ला देण्‍यात येईल. शिबीराच्‍या तारखा पुढील प्रमाणे असून शिबीराची वेळ 9 ते 1 वाजेपर्यंत राहील.
     बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2012 रोजी सार्वजनिक वाचनालय, सानेवाडी, वर्धा, मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2012 रोजी लाला लजपतराव प्राथमिक शाळा, पुलफैल, वर्धा, गुरुवार दि. 15 मार्च 2012 रोजी गुरुवार शिवाजी प्राथमिक शाळा, स्‍टेशनफैल, वर्धा, बुधवार दि. 21 मार्च  2012 रोजी समाज मंदिर, बुरड मोहल्‍ला, वर्धा व मंगळवार दि. 27 मार्च 2012 रोजी वसंत प्राथमिक शाळा, इंदिरा नगर, वर्धा येथे होईल.
    आरोग्‍य शिबिरांमध्‍ये नागरीकांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने सहभागी होवुन आरोग्‍य तपासणी व उपचार करुन घेण्‍याचा लाभ घ्‍यावा. असे आवाहन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment