Tuesday 7 February 2012

सेलू येथे शेतक-यांना सोयाबीनचे प्रशिक्षण


     वर्धा,दि.7- माहेर मंगल कार्यालय सेलु येथे सोयाबीन पिकविणा-या शेतकरी गटाच्‍या  प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्‍वती पुजन करुन करण्‍यात आले. मुख्‍य कार्यक्रमामध्‍ये उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी गट शेतीचे महत्‍व, शासनाच्‍या कृषि विभागाच्‍या विविध योजना, कृषि यांत्रीकीकरण, महात्‍मा गांधी नरेगा इत्‍यादी विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले.
      डॉ.पेशकर यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान,सोयाबीनवर येणारे किड व रोग,एकात्‍मीक किड व्‍यवस्‍थापन इत्‍यादी बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेतक-याच्‍या अडिअडचणी समजावून त्‍यावर काय उपाय योजना करता येतील तसेच ग्राम बिजोत्‍पादन यावर शासनाच्‍या विविध योजना व्‍दारे उपाय सुचविले तसेच गट शेतीचे महत्‍व विषद केले. डॉ. नेमाडे कार्यक्रम समन्‍वय कृषि विज्ञान केंद्र सेलसुरायांनी सोयाबिनच्‍या सुधारीत जाती, तन नाशक व किटक नाशक फवारतांना घ्‍यावयाची काळजी यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.
      कृषि विज्ञान केंद्राच्‍या श्रीमती ठाकरे यांनी सोयाबिनचे आहारातील महत्‍व,सोयोबिन पासुन प्रक्रियायुक्‍त पदार्थ कसे तयार करावे.उदा. सोयामिल्‍क,सोयाआटा,सोयाफटाणे,सोयापनीर इत्‍यादी बाबीवर मार्गदर्शन केले. व योजनेचा लाभ घेण्‍याकरीता सर्व शेतकरी बंधुना आवाहन केले.
     डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापिठाचे माजी प्राध्‍यापक डॉ. पेशकर, तालुका कृषि अधिकारी  पाटील, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व सेलु तालुक्‍यातील सोयाबीन गट प्रमुख व सदस्‍य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन हनुवते यांनी केले.
                             0000000   

No comments:

Post a Comment