Tuesday 7 February 2012

विदर्भ विकास योजने अंतर्गत शेतकरी गटांचे प्रशिक्षण


       वर्धा, दि.7- विदर्भ विकास योजने अंतर्गत शेतकरी गटांचे प्रशिक्षण नुकतेच (दि.12 जानेवारी 2012 रोजी) तालुक्‍यातील सोनामाता देवस्‍थान, एकुर्ली येथील प्रगतीशील शेतकरी सरपंच पुंडलिक चुटे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांचे घरासमोरील प्रांगणात  झाले.
     प्रशिक्षणास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेतक-यांच्‍या शेतीबाबत येणा-या अडचणी संदर्भात व कृषि विभागाच्‍या योजनाबाबत सविस्‍तर माहिती दिली. डायरे, जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी शेतीचे नियोजना करीता येणा-या समस्‍या  व त्‍यांची सोडवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. मिलिंद भेंडे यांनी गांव निहाय शेती समस्‍या जाणून घेऊन त्‍या प्रमाणे नियेाजन करुन समस्‍या सोडवावी असे प्रतिपादन केले. उपविभागीय कृषि अधिकारी डांबरे यांनी गट स्‍थापना कशी करावी व गटांचे निर्मितीमुळे होणारे फायदे याबाबत सविस्‍तर माहिती दिली.
     यावेळी शेतक-यांना कापूस वेचणी यंत्राचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. तालुका कृषि अधिकारी येवले यांनी गहु पिकाचे उत्‍पन्‍न वाढीसाठी करावयाच्‍या उपाययोजना बाबत सविस्‍तर माहिती दिली. पुंडलिकराव चुटे यांचे शेतात कापूस पिकावर ठिंबक सिंचन संच लावल्‍यामुळे आलेल्‍या पिकाचे उत्‍पन्‍नात वाढ कशी होते याबाबत पाहणी केली. कापसाचे चार एकर क्षेत्रात 70 क्विंटल  कापूस निघाला असून, अजून झाडांवरील शिल्‍लक बोंडाची संख्‍या लक्षात घेता तेवढाच कापूस अजून निघेल. अशी आशा व्‍यक्‍त केली. तसेच गहु पिकाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले.
    कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तिमांडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने शेतकरी उपस्थित होते.
                            000000

No comments:

Post a Comment