Thursday 16 February 2012

जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार 2012


        वर्धा,दि.17- महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांच्‍या कार्याचे मुल्‍यमापन करुन त्‍यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या उद्देशाने दिनांक 1 मे 2012 रोजी महाराष्‍ट्र दिनी जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार जिल्‍ह्यातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक , संघटक म्‍हणून प्रत्‍येकी एक पुरस्‍कार  प्रदान करण्‍यात येत असते.
     पुरस्‍कारा  बाबतचे निकष पुढील प्रमाणे आहे.
     पुरस्‍काराचे वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील गत 3 वर्षाची कामगीरी, पात्रतेचे निकष पुरस्‍कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्‍या जिल्‍ह्यात सलग 10 वर्ष वास्‍तव्‍य असले पाहीजे. क्रीडा मार्गदर्शक म्‍हणून सतत 5 वर्ष संबंधीत जिल्‍ह्यात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहीजे. क्रीडा संघटक किंवा कार्यकर्त्‍यांनी सलग 5 वर्षे त्‍या जिल्‍ह्यात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहीजे. व खेळाडूंनी  सतत तीन वर्षे त्‍या जिल्‍ह्याचे मान्‍यताप्राप्‍त खेळांच्‍या अधिकृत स्‍पर्धेमध्‍ये प्रतीनिधीत्‍व केले असले पाहीजे.
    एका जिल्‍ह्यामध्‍ये जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार  प्राप्‍त  करणारी व्‍यक्‍ती जिल्‍ह्यातील अन्‍य जिल्‍ह्यात जिल्‍हा पुरस्‍कारासाठी अर्ज करण्‍यास पात्र राहणार नाही.  एकदा एका खेळामध्‍ये किंवा एका प्रवर्गामध्‍ये जिल्‍हा पुरस्‍कार  प्राप्‍त केलेली व्‍यक्‍ती  पुन्‍हा त्‍याच खेळात किंवा त्‍या प्रवर्गात जिल्‍हा क्रीडा पुरस्‍कार  मिळण्‍यास पात्र असणार नाही. संघटक कार्यकर्त्‍यांस किमान 10 वर्षाचा अनुभव असावा व त्‍याचे वय कीमान 50 वर्षे असावे. निकषांची पूर्तता करणा-या खेळाडू व्‍यक्‍तींनी आपला   आपला विहीत नमुना अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी 2012 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा येथून विनामूल्‍य  उपलब्‍ध करुन घ्‍यावे तसेच परीपूर्ण अर्ज भरुन व विहित नमुन्‍यात दर्शविलेल्‍या  कागद पत्रांची पूराव्‍यासह पूर्तता करुन जिलहा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा येथे सादर करण्‍याची अंतीम तारीख दिनांक 7 मार्च 2012 आहे.
    वर्धा जिल्‍ह्यातील खेळाडू व्‍यक्‍तींनी पुरस्‍काराबाबतचे विहीत नमुना अर्ज व संबंधीत पुरस्‍काराविषयी  अधिकची माहिती करीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                           000000 

No comments:

Post a Comment