Thursday 22 March 2012

येत्या 28 मार्चला बच्छराज धर्मशाळेत तेजस्विनी प्रदर्शनी व विक्री


        वर्धा,दि.21- महाराष्‍ट्र शासनाच्‍या तेजस्विनी महाराष्‍ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमातंर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मागील वर्षाच्‍या यशस्‍वीतेनंतर यावर्षीही बचत गट व उद्योजकांकरीता तेजस्विनी भव्‍य प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन येत्या 28 मार्च ते 31 मार्च 2012  या कालावधीत बच्‍छराज धर्मशाळा, मेन रेल्‍वे स्‍टेशनच्‍या  बाजूला, शास्‍त्री चौक,वर्धा येथे करण्‍यात आलेले आहे.
          या प्रदर्शनीमध्‍ये महिला उद्योजक व बचत गटांनी तयार केलेले उत्‍पादन व खाद्य पदार्थाचे स्‍टॉल, व्‍यावसायिक स्‍टॉल यांच्‍या व्‍दारे घरगूती सामान, मसाले, पापड, लोणची, शेवळ्या, सुरभी बॅग, चिनीमातीच्‍या आकर्षक वस्‍तू, बांबू क्रॉप्‍ट इत्‍यादी वस्‍तु प्रदर्शनामध्‍ये सहभागी होतील. जनतेने  या प्रदर्शनीला भेट देऊन स्‍टॉलधारकाचा आनंद  व्दिगुणित करावा.
      उद्योजक व बचत गटांनी स्‍टॉल बुकींगकरीता महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा कार्यालय, तिवारी बिल्डिंग, बजाज बालक मंदिर पुढे, बॅचलर रोड,वर्धा  येथे संपर्क साधावा. असे वरिष्‍ठ जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा कार्यालय,   वर्धा यांनी कळविले आहे.
                                                  00000000

No comments:

Post a Comment