Tuesday 20 March 2012

मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी ई-स्‍कॉलरशिप योजना ऑन लाईन अर्ज येत्या 27 मार्च पर्यंत भरावा


       वर्धा,दि.20-  महाराष्‍ट्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी ई-स्‍कॉलरशिप योजना कार्यान्वित केलेली आहे. या याजनेमूळे शिष्‍यवृत्‍तीची रक्‍कम थेट मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांच्‍या खात्‍यात तर शिक्षण फी, परीक्षा फी व इतर अनुषंगिक फी संबंधित महाविद्यालयाच्‍या खात्‍यात जमा होणार आहे. जे मागासवर्गीय विद्यार्थी ऑन लाईन अर्ज भरतील त्‍यांनाच मॅट्रीकोत्‍तर शिष्‍यवृत्‍तीचा आणि संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी  व परीक्षा फी चा लाभ देण्‍यात येणार आहे.
यासाठी इयत्‍ता 10 वीच्‍या पुढील शिक्षण घेत असलेल्‍या  सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांनी http://mahaeschol.maharashtra.gov.in/scholarship/login.aspx या  वेबसाईटवर  दिनांक  15  फेब्रुवारी 2012  पर्यंत  अर्ज भरण्‍याची अंतिम मुदत देण्‍यात आली  होती. तथापि दि. 15 फेब्रुवारी 2012 नंतर सुध्‍दा अनेक विद्यार्थी व महाविद्यालयाकडून  ऑनलाईन अर्ज  भरण्‍याचे राहून गेलेले आहे. त्‍यामूळे अनेक विद्यार्थी , विविध संघटना व महाविद्यालयांनी  याविषयी विनंती  केल्‍याने आता ऑनलाईन  फॉर्म भरण्‍याची  मुदत  दि. 27 मार्च 2012 पर्यंत  वाढविण्‍यात आलेली आहे. वाढीव मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणा-या विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती किंवा शिक्षण फी, परीक्षा फी एप्रिल किंवा मे 2012 नंतर मिळेल याची विद्यार्थ्‍यांनी तसेच प्राचार्यांनी नोंद घ्‍यावी. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. तसेच विहित मुदतीनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्‍यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्‍याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.
 ऑन लाईन अर्ज भरताना इयत्‍ता 10 वी च्‍या परीक्षेचा आसन क्रमांक (Seat Number) आणि उत्‍तीर्ण झाल्‍याचे वर्ष ( Year  of Passing)  ही माहिती सोबत ठेवणे अत्‍यावश्‍यक आहे.
याविषयी काही अडचणी असल्‍यास जिल्‍ह्याचे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण किंवा प्रादेशिक उपायुक्‍त, समाज कल्‍याण विभाग यांचेशी संपर्क साधावा.                                                                
                                                    0000000

No comments:

Post a Comment