Thursday 22 March 2012

जागतिक ग्राहक दिन साजरा


         वर्धा,दि.21-  जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे विद्यमाने नुकतेच (दि.15 मार्च रोजी) जागतिक ग्राहक दिनाचा शासकीय कार्यक्रम विकास भवन  येथे आयोजित करण्‍यात आला.
उदघाटन करताना जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच चे अध्‍यक्ष ए.एन.कांबळे 
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच चे अध्‍यक्ष ए.एन.कांबळे, प्रमुख अतिथी  निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्‍या ॲड. विभा देशमुख, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषदेच्‍या अध्‍यक्ष उषा फाले, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे सचिव अजय भोयर तसेच जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.एन.अनभोरे, तहसिलदार सुशांत बनसोडे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष यांनी ग्राहक मंचाच्‍या कार्यपध्‍दती विषयी सविस्‍तर माहिती दिली.  यावेळी ॲड. विभा देशमुख यांनी  ग्राहकांच्‍या हिताकरीता सन 1986 मध्‍ये कायदा करण्‍यात आला आहे.  त्‍या अन्‍वये ब-याच संघटना निर्माण झाल्‍या व जनतेमध्‍ये ग्राहक हक्‍काबाबत माहिती देण्‍यात आली. या कायद्यामध्‍ये डॉक्‍टर व वकिल यांच्‍या विरुध्‍दही ग्राहक मंचाकडे दाद मागता येते अशी माहिती दिली.   
 फसवणुक झालेल्‍या ग्राहकांनी इतर ग्राहकांना जागृत करुन सावध करण्‍याची जबाबदारी स्विकारण्‍याची गरज आहे तसेच संघटनेच्‍या माध्‍यमातून कठोर ग्राहक चळवळ निर्माण करावी व शहरापासुन ते गावा गावा पर्यंत ग्राहक हक्‍का बाबत जनतेमध्‍ये माहिती देण्‍याबाबत सर्व स्‍तरावरुन प्रयत्‍न व्‍हावे असे निर्देश देण्‍यात आले. तसेच ग्राहक हक्‍क्‍बाबत  राजेश खवले यांनी माहिती दिली. 
        तत्‍पूर्वी  दीप प्रज्वलन तसेच स्‍वामी विवेकानंदाचे प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली.
         कार्यक्रमाचे संचालन धर्माधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन आर.ए.अनभोरे यांनी केले. कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रा.पंचायत, अखिल भारतीय ग्राहक परिष्‍द व जिल्‍हा ग्राहक संघटना यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

                                                       0000000

No comments:

Post a Comment