Wednesday 29 June 2011

29 june 2011 news fold


                        महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.      291         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा         दि.29 जून 2011
--------------------------------------------------------------------------
          शेतकरी आत्महत्याची तीन प्रकरणे मदतीस पात्र
     वर्धा, दि.29- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्याच्या आढावा बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्याची तीन प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली.
     या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बन्सोड, पोलीस अधिक्षक यु.पी.जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, स्वयंमसेवी संधटनेचे प्रतिनिधी सोहम पंड्या, कृषी भुषण पुरस्कार प्राप्त नंदकिशोर तोटे, अनिल मेघे व अन्य सदस्य उपस्थित होते.
     आज झालेल्या शेतकरी आत्महत्याच्या आढावा बैठकीमध्ये 12 प्रकरणे ठेवण्यात आली त्यामध्ये तीन प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली आहे. शिल्लक नऊ प्रकरणामध्ये एक प्रकरण कृषी विभागाच्या अहवालासाठी प्रलंबित ठेवण्यात आले तर चार प्रकरणे आत्महत्याच्या प्रवर्गातून वगळण्यात आले तर चार प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले आहे. आत्महत्याचे प्रवर्गातून वगळण्यात आलेल्या प्रकरणामध्ये आत्महत्याग्रस्त दोन प्रकरणात  13 वर्षीय मुलाचा समावेश असून दोन प्रकरणात मृतकाचे नावे जमीन नाही. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कर्जाचा तगादा, नापिकी व कर्जबाजारीपणा ही कारणे पूर्ण करीत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्याची चार प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे.
                        000000

     महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.      292        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.29 जून 2011
--------------------------------------------------------------------------
              युवक कल्याण अनुदान योजनेसाठी
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
     वर्धा, दि.29-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाव्दारे राबविण्यात येणा-या युवक कल्याण अनुदान योजना अंतर्गत प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे.
     यामध्ये शैक्षणिक संस्था, मान्यताप्राप्त शाळा/महाविद्यालये, पंजीबध्द व्यायाम संस्था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे, महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागातीलयुवकांसाठी समाजसेवा शिबीरे आयोजित करणे, स्वयंम रोजगार कार्यक्रम शिबीराचे आयोजन करणे, युवक नेतृत्व शिबीराचे आयोजन करणे, आरोग्य तपासणी नेत्रदान शिबीर प्रथोमपचार शिबीर आयोजित करणे, बालविवाह/अस्पृष्यता विरोधी मोहिम, जिल्हा व तालुका पातळीवर युवक महोत्सवाचे आयोजन करणे, युवक पत्रिका प्रकाशित करणे, युवकांच्या समस्यांवर चर्चासत्र/ वादविवाद स्पर्धा वकृत्व स्पर्धा काव्य गायन इत्यादी शिबीराचे आयोजन करणे, ग्रामीण विकास कार्यक्रम उदा.वृक्षारोपन, स्वच्छता मोहिम, आरोग्य व स्वच्छता विषयक शिबीरे आयोजितकरणे व सांस्कृतिक कार्यक्रम उदा. नाट्य,संगीत, नृत्य, इतयादी बाबत कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करणे इत्यादी बाबींचा समावेश असून, या योजने अंतर्गतअंदाजित खर्चाच्या 50 टक्के कमाल 0.25 लाख रु. अनुदान मंजूर करण्यात येते.
     विहित नमुन्यातील अर्ज,नियम,अटी व शर्ती प्राप्त करुन घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी,जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
                           0000000

महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.      293        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.29 जून 2011
--------------------------------------------------------------------------
                        क्रिडांगणासाठी प्रस्ताव आमंत्रित
वर्धा,दि.29-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाव्दारे राबविण्यात येणा-या क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत शैक्षणिक संस्था, मान्यताप्राप्त शाळा व महाविद्यालये,पंजीबध्द व्यायाम संस्था,क्रीडा मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना क्रीडांगण समपातळी करणे, 200 मी. अथवा 400 मी.चा धावन मार्ग तयार करणे. क्रीडांगणा भोवती कुंपन घालणे, विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणा शेजारी प्रसाधनगृह बांधणे, क्रीडांगणाजवळ पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे इत्यादी करीता प्रस्ताव मागविण्यातयेत आहे.
     या योजने अंतर्गत बिगर आदिवासी भागातील संस्थांनाअंदाजित खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख पैकी कमी असणारी रक्कम अनुदान म्हणुन मंजुर करण्यात येते. आदिवासी भागातील संस्थांना अंदाजित खर्चाच्या90 टक्के किंवा कमाल रु. 2 लाख पैकी कमी असणारी रक्कम अनुदान म्हणुन मंजुर करण्यात येते. तसेच आदिवासी विभागामार्फत चालविल्या जाणा-या शासकीय आश्रमशाळा, स्थानिक सवराजय संस्था यांना 100 टक्के अनुदान रु. 2 लाखापर्यंत पैकी कमी असणारी रक्कम अनुदान म्हणुन मंजूर करण्यात येते.
     या योजनेसाठी संस्थेकडे संस्थेच्या मालकीची जागा अथवा शासनाकडून दिर्घ मुदतीच्या करारावर उपलब्ध असलेली जागा असणे आवश्यक आहे. जागा उपलब्ध असलेल्या व इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज,नियम,अटी व शर्ती प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावे. संस्था नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सोबत आणावी.असे जिल्हा क्रीडा अधिकारी,वर्धा कळवितात.
                           000000


No comments:

Post a Comment