Thursday 10 November 2011

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूकीच्या काळात पुरेसा पोलीस दल आवश्यक - जिल्हाधिकारी

                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9/11/2011
---------------------------------------------------------------------
       कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूकीच्या काळात
             पुरेसा पोलीस दल आवश्यक 
-          जिल्हाधिकारी 
    वर्धा, दि.9- जिल्ह्यात होणा-या सहा नगर परिषदेच्या  निवडणूका शांततेच्या वातावरणात व निर्भयपणे होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस दल आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी व्यक्त केले.
     काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवउणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची आढावा बेठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रंसगी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार,अप्पर जिल्हाधिकारी एस.एम.भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वर्धाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय देने, हिंगणघाटचे निवडणूक निर्णय अधिकारी उमेश काळे, आर्वीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल करोडे, पुलगावचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश मेश्राम, देवळीचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश धार्मिक व सिंदी(रे) चे निवडणूक निर्णय अधिकारी रमन जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील, देवळीचे ठाणेदार पुंडलिक सपकाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
     जिल्ह्यात प्राथमिकदृष्टया संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये नगर परिषद हिंगणघाट क्षेत्रामध्ये दहा , आर्वी येथे सहा मतदान केंद्र असून त्यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की नगर परिषद क्षेत्रातील ज्या व्यक्तींना शस्त्र परवाने दिले आहेत किंवा ज्या पक्ष प्रमुखाकडे असे परवानेअसतील त्यांचे शस्त्र निवडणूकीच्या कालावधीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ते परत घेण्याची कार्यवाही करावी. नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड गर्दी गृहीत धरता पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी वेळीच नियेाजन करण्याची गरज आहे. मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी आठवडी बाजार असतील त्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार नाही याची दक्षता घेवून इतरत्र कोणत्याही दिवशी आठवडी बाजार भरविण्यात यावे.
     जिल्ह्यात 37 प्रभाग असून त्यामध्ये वर्धेत दहा, हिंगणघाट येथे आठ, आर्वी येथे सहा, पुलगाव येथे 5, देवळी व सिंदी (रे) येथे प्रत्येकी चार प्रभाग आहे. वर्धा येथे 88 हजार 567 , हिंगणघाट येथे 76 हजार 671, आर्वी 32 हजार 323, पुलगांव 25 हजार 759 , देवळी 12 हजार 543 व सिंदी (रे) येथे      9 हजार 939 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
     निवडणूकीच्या कालावधीमध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाय योजना करीत असून, निवडणूकीसाठी मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करुन राजकीय पक्षांनी तसेच निवडणूक लढविण्या-या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
     याप्रसंगी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
                           00000

No comments:

Post a Comment