Tuesday 12 July 2016

राजर्षी शाहू महाराजाचे विचार आजच्‍या पिढीनी अंगिकारावे
-         खासदार रामदास तडस
Ø  सामाजिक न्‍याय दिन संपन्‍न
वर्धा,दि.26-राजर्षी शाहू महाराजांनी  बहुजन समाजात शिक्षण व क्रिडा प्रसार करण्‍यावर विशेष भर दिला. कोल्‍हापुर संस्‍थानात प्राथमिक शिक्षण संक्‍‍तीचे व मोफत केले. स्‍त्री शिक्षणाचा प्रसार व्‍हावा म्‍हणुन त्‍यांनी राजाज्ञा काढली. अस्‍पृश्‍यता नष्‍ट करण्‍याच्‍या दृष्‍टीने वेगळया शाळा भरविण्‍याची पध्‍दत बंद केली. त्‍यांचे हेच विचार लोकप्रतिनिधीच्‍या माध्‍यमातून गावपातळीवर नेऊन आजच्‍या पिढीनी त्‍यांचे विचार अंगिकारावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
सामाजिक न्‍याय भवन येथे आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्‍या जयंती दिनानिमित्‍त सामाजिक न्‍याय दिन कार्यकामाचे आयोजन करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी खासदार रामदास तडस प्रमुख अतिथी म्‍हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल होते. आमदार डॉ. पंकज भोयर, उपपोलिस अधिक्षक(गृह) आर. किल्‍लेकर, मधुकर कासारे, सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण बाबासाहेब देशमुख, जि.प. चे समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना रामदास तडस म्‍हणाले की, जो पर्यंत गाव सक्षम होत नाही तो पर्यंत शहर सक्षम होत नाही यासाठी गावाचा विकास करणे गरजेचे असून यासाठी शाहू महाराजाच्‍या विचाराची प्रेरणा घेऊन शासनाने मागासवर्गीयासाठी शिष्‍यवृत्‍ती , कौशल्‍य विकास , दादासाहेब सबळीकरण सारख्‍या योजना सुरु केल्‍या आहे. शाहू महाराजाचे विचार गावातील शेवटच्‍या माणसापर्यंत पोहोचविण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल म्‍हणले की, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्‍मा  ज्‍योतिबा फुले , महात्‍मा गांधी यारख्‍या थोर पुरुषाचे आचार, विचार समाजामध्‍ये रुजले पाहिजे. कोणताही समाज सामाजिक न्‍यायाशिवाय जास्‍त दिवस चालू शकत नाही. समाजातील सर्व घटक एकत्रित येत नाही तोपर्यंत समा‍जात सुधारणा होत नाही. व समाजाचा विकास होऊ शकत नाही नाही. यासाठी गावपातळीवरील विकास करण्‍यासाठी शासन प्रशासनासोबतच लोकसहभागाची गरज असल्‍याचे यावेळी जिल्‍हाधिकारी यांनी आपल्‍या अध्‍यक्षीय भाषाणात सांगितले .
यावेळी  आमदार डॉ. पंकज भोयर, श्री. किल्‍लेकर, मधुकर कासारे यांची समायोचित भाषणे झाली.


कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात बाबासाहेब देशमुख यांनी शाहू महाराज यांनी आपल्‍या राज्‍याच्‍या उत्‍पन्‍नाचा मोठा भाग शिक्षणावर करीत असत त्‍यांनी वसतीगृहाची मोठी चळवळ उभी करुन विद्यार्थ्‍यांच्‍या निवासी शिक्षणाची सोय केली त्‍यामुळे शासकीय स्‍तरावर मोठया प्रमाणावर शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्‍याय दिवस म्‍हणुन साजरी करण्‍यात येत आहे.
यावेळी दहावी व बारावी च्‍या विद्यार्थ्‍यांना शाहू महाराज गुणवत्‍ता पुरुस्‍कार तसेच सामाजिक न्‍याय विभागाअंतर्गत येणा-या महामंडळाव्‍दारे लाभार्थ्‍यांना कर्जाचे धनादेशाव्‍दारे मान्‍यवरांचे हस्‍ते वितरण करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रविण वानखेडे यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेक यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment