Tuesday 12 July 2016

हिंगणघाटच्‍या हायब्रिड सिड्स व राजझींग कंपनीला
                 धान बियाणे विक्री बंद करण्‍याचे आदेश
            वर्धा,दि.8- यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. हिंगणघाट व राजझींग संन्‍स प्रा.लि. हिंगणघाट या कंपनीच्‍या धान बियाण्‍याची उगवन न झाल्‍यामुळे शेतक-यांच्‍या तक्रारीवरुन कंपनीला धान बियाण्‍याची विक्री बंद करण्‍याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. हिंगणघाट व राजझींग संन्‍स प्रा.लि. हिंगणघाट या कंपनीचे खरीप हंगामामध्‍ये त्‍यांचे उत्‍पादित धान बियाण्‍याची  नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व इतर जिल्‍हयात मोठया प्रमाणात विक्री करण्‍यात आली. परंतु शेतक-यांने सदर बियाणे पेरणी केली असता नागपूर व चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये सदर बियाणयाची उगवण झाली नसल्‍याच्‍या तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्‍त झाल्‍या. त्‍या अनुषंगाने सदर कंपनीला तात्‍काळ दि.7 जुलै रोजी जिल्‍हा परिषदचे कृषी विकास अधिकारी एस.एम खळीकर, जिल्‍हा कृषी अधिकारी एस.वाय. बमनोटे, हिंगणघाटचे कृषी अधिकारी एम.डेहनकर यांनी कंपनीच्‍या गोदामाला भेट देऊन तपासणी केली.
तपासणी मध्‍ये कंपनीच्‍या गोदामात एकुण 843.96 क्विंटल बियाणे असल्‍याचे दिसुन आले. त्‍यासंपूर्ण बियाण्‍याला विक्रीबंद आदेश देण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली तसेच पुढील आदेशापर्यंत सदर साठा जप्‍त करण्‍यात आला. साठयामध्‍ये धान बियाणे वान श्रीराम 6170 बॅग, ओम 3 हजार 110 बॅग, एस.आर.के. 345 बॅग, अंबिका 75 बॅग, यशोदा 1011,615 बॅग, यशोदा बोल्‍ड 830 बॅग, यशोदा बोल्‍ड 416 बॅग असे एकुण 819 क्विंटल बियाणे यशोदा हायब्रिड कंपनीचे व राजझिंग सन्‍स प्रा.लि. या कंपनीचे वाण वाय.एस.आर. 45 बॅग असे एकुण 24.96 क्विंटल बियाणाचा समावेश आहे.
0000





No comments:

Post a Comment