Saturday 30 June 2012

शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळेत एच.एस.सी.व्‍होकेशनल साठी प्रवेश


         वर्धा दि.30- शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळेत वर्ग 11 वी एच.एस.सी.व्‍होकेशनल अभ्‍यास क्रमाकरीता प्रवेश सुरु झाले आहेत.
            संस्‍थेमध्‍ये मेक्‍यानिकल टेक्‍नॉलॉजी 30 जागा,ऑटो इंजिनिअरींग टेक्‍नीशियन 30 व मेन्‍टेनंन्‍स अॅण्‍ड रिपेअर्स ऑफ इलेक्‍ट्रीकल डोमेस्‍टीक अप्‍लायसेंस 30 अशा एकूण 90 जागेकरीता प्रवेश देण्‍यात येणार आहे. स्‍वतंत्र वर्कशॉप व प्रयोगशाळा, विद्यार्थ्‍यांना प्रात्‍यक्षिक व थिअरीचे मागदर्शन,  तसेच ऑन दी जॉब ट्रेनिंग,इंडस्‍ट्रीयल व्‍हीजीट, रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, व्‍यवसाय तंत्र प्रदर्शनी आयोजित केली जाते.
            जिल्‍हा उद्योग केंद्र,एम.सी.ई.डी. विविध विकास महामंडळे,बँका यांचे मार्फत विद्यार्थ्‍यांना स्‍वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्‍यात येणार असून एच.एस.सी. व्‍होकेशनल पास झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना शिकाऊ उमेदवारी तसेच कारखाण्‍यामध्‍ये नोकरी मिळू शकते, हा अभ्‍यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्‍यांना उच्‍च शिक्षण बी.ए.,बी.कॉम,प्रवेश मिळतो तसेच इतरही विविध पदवी अभ्‍यासक्रमाला प्रवेश मिळतो.हा अभ्‍यासक्रम रोजगार व स्‍वयंरोजगार मिळवून देणारा आहे.
            विद्यार्थ्‍यांनी एच.एस.सी. व्‍होकेशनल या अभ्‍यासक्रमाला प्रवेश ध्‍यावा असे आवाहन मुख्‍याध्‍यापक तसेच जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आर.डी.भोयर यांनी केले आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी टी.एस.भोयर यांचेशी 9850677906 संपर्क साधावा.
00000

No comments:

Post a Comment