Wednesday 27 June 2012

जिल्‍ह्यात बियाणांचा मुबलक पुरवठा - श्रीमती जयश्री भोज


  

  शेतक-यांनी  अधिकृत  विक्रेत्‍याकडूनच  बियाणे खरेदी करावे
                                               
वर्धा, दि. 27-  खरिप हंगामासाठी  जिल्‍ह्यात  4 लक्ष 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रात  नियोजन  करण्‍यात आले असून   त्‍यानुसार   कापूस , सोयाबीन ,तूर , ज्‍वारी  आदी  बियाणांचा आवश्‍यकतेनुसार  पुरवठा उपलब्‍ध  करुन देण्‍यात आला आहे.  शेतक-यांनी  अधिकृत विक्रेत्‍याकडून  व  निर्धारीत दरानेच बियाणांची  खरेदी करावी  असे आवाहन जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी   1 लक्ष 22 हजार 943 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्‍यता आले होते त्‍यानुसार  90 हजार क्विंटलपेक्षा जास्‍त बियाणांचा  पुरवठा  झालेला असून  सोयाबिन पिकांचे
बियाणे बदल कार्यक्रमा अंतर्गत  85 टक्‍के प्रमाणे बियाणांची  मागणी  नोंदविण्‍यात आली असून शेतक-याला आवश्‍यकतेनुसार  सर्व बियाणे उपलब्‍ध  असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
            जिल्‍ह्यात  बियाणांच्‍या  मागणीनुसार पुरवठा व विक्री  सुरु असून 25 जून पर्यंत 59 हजार 310  क्विंटल बियाणांची  विक्री  पूर्ण झाली आहे. यामध्‍ये 20 हजार 410 सार्वजनिक  तर 38 हजार 900 क्विंटल  बियाणे खाजगी विक्रेत्‍याकडून झाले आहे. संकरीत कापसाची  2 हजार 239 क्विंटल  तर सायोबीनची  56 हजार 200 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.
            जिल्‍ह्यासाठी  90 हजार  055 क्विंटल बियाणांचा पुरवठा  करण्‍यात आला असून महाबीजसह सार्वजनिक  वितरकांकडे  32 हजार 343 क्विंटल तर खाजगी विक्रेत्‍यांकडे 57 हजार 712 क्विंटल बियाणांचा साठा उपलब्‍ध्‍ा आहे.  ज्‍वारी 51  क्विंटल, संकरीत कापूस 4 हजार 250 क्विंटल, सोयाबिन 82 हजार 980 क्विंटल , तूर 2 हजार 746 क्विंटल , मूंग 16 क्विंटल , उउीद 9 क्विंटल, तिळ  3 क्विंटल चा पुरवठा उपलबध करुन देण्‍यात आलयाची माहितीही  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  यावेळी दिली.
                                                                        000000



                            जिल्‍ह्यात  सरासरी 102 मि.मी. पावसाची नोंद
            जिल्‍हयात  पावसाने  हजेरी लावल्‍यानंतर  26 जून पर्यंत 102 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामध्‍ये  सर्वाधिक 175.03 मि.मी. पाऊस हिंगणघाट तालुक्‍यात पडला आहे.
आर्वी 173.05 मि.मी., आष्‍टी  55.08 मि.मी., कारंजा 87.06 मि.मी., वर्धा 58.02 मि.मी., देवळी 66.04 मि.मी., सेलू 44 मि.मी. , समुद्रपूर 156.05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील  चार पाच दिवसापासून पावसाने  खंड दिल्‍यामुळे  पाणी उपलब्‍ध असल्‍यास शेतक-याने ज्‍या  क्षेत्रात पेरणी  केली आहे त्‍या क्षेत्रात स्‍‍प्रींकल पध्‍दतीने संरक्षीत पाणी द्यावे. असे आवाहन   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री. बि.एम. ब-हाटे यांनी केले आहे.
                                                              0000000

No comments:

Post a Comment