Monday 25 June 2012

मंत्रालयात जळालेल्‍या संचिका प्रकरणाच्‍या पुर्नबाधनिला तातडीने प्रारंभ-जयश्री भोज


मंत्रालयात जळालेल्‍या संचिका प्रकरणाच्‍या पुर्नबाधनिला तातडीने प्रारंभ
                                                -जयश्री भोज
-सेतु सुविधा केंद्रामार्फत तातडीने प्रकरणे स्विकारणार
-प्रकरण स्विकारण्‍याचा कालावधी 15 दिवस
-नागरीकांनी सहकार्य करण्‍याचे आवाहन
वर्धा दि.24-  मंत्रालयाच्‍या इमारतीला 21 जून रोजी आग लागल्‍यामुळे मुख्‍यमंत्री , उपमुंख्‍यमंत्री , राज्‍यमंत्री व मुख्‍यसचिवाच्‍या कार्यालयातील व  विभागातील महत्‍वाची कागदपत्रे जळलेली आहे. या घटनेतील जळालेल्‍या कागदपत्राची पुनर्बाधनीचे काम शासनाने युध्‍द स्‍तरावर हाती घेतलेले असून ज्‍या  नागरीकांनी अर्ज केले असतील तसेच जिल्‍हा जिल्‍हयात पाठविलेले प्रकरणे व कार्यालयाने संबधीत मंत्रालयात प्रलबिंत असल्‍यास त्‍या  प्रकरणाची संचिका प्रत्‍येक तहसिल कार्यालयात उघडण्‍यात  आलेल्‍या सेतू संबंधी मार्फत स्विकारुन त्‍या शासनाला पुर्नबांधनीसाठी पाठविण्‍यात येतील . या कार्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
            आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात मंत्रालयातील इमारतीत लागलेल्‍या आगीमुळे जळालेल्‍या संचिका बाबत पुर्नबाधनी व करावयाच्‍या उपायोजने बाबत जिल्‍हाधिकारी भेाज यांनी मार्गदर्शन केले. त्‍या प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या यावेळी  अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, अप्‍पर पोलीस अधिक्षक टि.एस.गेडाम, निवासी उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगितराव, उपजिल्‍हाधिकारी शैलेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत होते.
            मंत्रालयाला लागलेल्‍या आगित मुख्‍यमंत्री , उपमुख्‍यमंत्री, व मंत्र्याच्‍या विभागामध्‍ये  आदिवासी विभाग, पर्यावरण पदुम व राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, आणि  अपारंपारीक उर्जा विभाग,याचा समावेश असून  राज्‍यमंत्री कार्यालयातील,विभागामध्‍ये  गृह विभाग, वित्‍त , सार्वजनिक बांधकाम, सास्‍कृतीकार्य, उच्‍च व तंत्रशिक्षण, पदुम पर्यावरण व सामान्‍य प्रशासन विभाग मुख्‍य सचिव यांच्‍या कार्यालयांतील विभागामध्‍ये नगर विकास विभाग, महसुल विभाग, मदत व पुनंर्वसन , वन विभाग, गृह विभाग, पर्यटन विभाग, परिवहन जलसंधारण विभागातील संचिका प्रकरणे जळाल्‍यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्‍यामुळे जिल्‍हयातील  संबधित विभागानी मंत्रालय स्‍तरावर संचिका प्रकरणाची एक यादी तयार करुन ती जिल्‍हाधिकारी कार्यालयाला दोन दिवसात  सादर करावी तसेच मंत्रालयातील संबधित विभागांना 15 दिवसाच्‍या आत पाठविण्‍यात यावी अशा सुचना जिल्‍हाधिकारी भोज यांनी दिल्‍या.
            ज्‍या नागरीकांनी मंत्रालयातील संबधित विभागाकडे अर्ज प्रकरणे सादर केली आहेत. त्‍या सादर केलेल्‍या  अर्ज प्रकरणाची प्रत तसेच संलग्‍न  कागदपत्रे व पोच पावती येत्‍या 15 दिवसात संबधित तहसील कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रामध्‍ये सादर करुन पोच पावती प्राप्‍त करुन घ्‍यावी प्राप्‍त प्रकरणे मंत्रालयातील संबधित विभागाला जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्‍यात येणार आहे.
येत्‍या काही दिवसात पावसाळी अधिवेशन होणार आहे. पावसाठी अधिवेशनाला फारमोठा अवधी उरलेला नाही विधीमंडळा मार्फत  करुन किंवा शासनाकडून विचारणा करण्‍यात आलेले प्रश्‍नाचे उत्‍तर संबधित विभागाने यापुर्वी पाठविलेले असल्‍यास अशी प्रकरणे या घटनेमुळे नव्‍याने  तयार करुन दोन दिवसाच्‍या आत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करुन संबधित विभागाला तातडीने पाठविण्‍यात यावे अशा सुचना त्‍यांनी यावेळी केल्‍या.
            याप्रसंगी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment