Monday 25 June 2012

पायका योजनेमध्‍ये ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण - श्रीमती जयश्री भोज


                                 ·         52 गावांमध्‍ये क्रीडांगणासाठी प्रत्‍येकी 1 लाख
·         ज्‍युडोच्‍या राष्‍ट्रीय स्‍पर्धा नोव्‍हेंबरमध्‍ये
·         25 राज्‍यातील 350 खेळाडूंचा समावेश
·         बॅडमिंटन हॉल त्‍वरित दूरुस्‍ती करा
·         शालेय क्रिडा स्‍पर्धाचे भव्‍य आयोजन

           वर्धा दि.25- जिल्‍हयातील ग्रामीण भागातील मुलांना विविध खेळाबद्दल प्रोत्‍साहन मिळावे व गावातच क्रीडांगणासह आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  पायका अंतर्गत यावर्षी 52 गावामध्‍ये प्रत्‍येकी एक लाख रुपये खर्च करुन क्रीडांगणासह  क्रीडासाहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात जिलहाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा क्रीडा परिषद,वर्धा जिल्‍हा क्रीडा संकुल कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या प्रसंगी मागदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या.
          पंचायत युवा खेळ व क्रीडा अभियान  (पायका) अंतर्गत मागील तीन वर्षापासून जिल्‍हयातील प्रमुख गावात खेळाडूसाठी क्रिडांगण तयार करण्‍यासाठी  प्रत्‍येकी  अेक लाख रुपये उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. दरवर्षी 52 गावामध्‍ये ही योजना राबविण्‍यात येत असून क्रीडांगणासाठी ज्‍या गावाची निवड झाली आहे. तथील कामाचा आढावा घेवून ग्रामीण भागातील उपलब्‍ध झालेल्‍या सुविधांचा आढावा घेण्‍याच्‍या सूचनाही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिल्‍यात.
            जिल्‍हा क्रीडा परिषदे मार्फत जिल्‍हयात तालुका,जिल्‍हा विभाग तसेच राज्‍यस्‍तरीय विविध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे. राष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्‍युडोच्‍या स्‍पर्धा नोव्‍हेंबर मध्‍ये वर्धा येथे आयोजित करण्‍यात येणार असून या स्‍पर्धांच्‍या आयोजना बाबतही यावेळी आढावा घेण्‍यात आला.
            राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी 25 राज्‍यातून 350 खेळाडू सहभागी होणार असून स्‍पर्धांचे आयोजन, निवास व भोजन व्‍यवस्‍था आदिबाबतही यावेळी संबंधित विभागांना त्‍यांनी सूचना दिल्‍यात.
            तालुका स्‍तरावर  दहा खेळांचे तसेच जिल्‍हा स्‍तरावर 62 खेळांचे विविध वयोगटातील मुले व मुलीसाठी आयोजन करण्‍यात येणार असून जिल्‍हयातील सर्व प्राथमिक व माध्‍यमिक शाळा,कनिष्‍ठ महाविद्यालयातील खेळाडूसाठी वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धांच्‍या आयोजनासाठी आवश्‍यक निधी तसेच तालुका व जिल्‍हा स्‍तरावर आयोजनासाठी कराव्‍या लागणा-या पूर्व तयारीचाही यावेळी आढावा घेण्‍यात                                 
                                                    जिल्‍हा क्रीडा संकुल
            वर्धा जिल्‍हयातील खेळाडूसाठी खेळाच्‍या दर्जेदार सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासोबत सुमारे 44 लाख 92 हजार रुपये खर्च करुन शुटींग रेंज विकसित करणे,मुला,मुलींच्‍या वसतिगृहाची सुधारणा करणे, जुन्‍या बहुउद्देशिय हॉलची सुधारणा करणे, तसेच तालुका क्रीडा संकुलाबाबतही यावेळी आढावा घेण्‍यात आला. वर्धा जिल्‍हयात आठ तालुक्‍यापैकी पाच तालुक्‍यात क्रीडा संकुल मंजुर करण्‍यात आले असून आर्वी,आष्‍टी, सेलू, देवळी या चार तालुक्‍यात प्रत्‍यक्ष कामाला सुरवात झाली आहे. हिंगणघाट येथील जागेचा प्रस्‍ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्‍यात आल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली. प्रारंभी जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी स्‍वागत करुन वर्धा जिल्‍हा क्रीडा संकुल तसेच पायका जिल्‍हा क्रीडा परिषदे अंतर्गत जिल्‍हयात सुरु असलेल्‍या विविध प्रकरणांची माहिती दिली. पायका अंतर्गत यावर्षी 52 गावांची निवड करण्‍यात आली असून लोकसंखेनुसार व तालुका प्रमाण ठेवून गावांची निवड केल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
            विविध क्रीडा स्‍पर्धा आयोजनासाठी निधीची उपलब्‍धता व खर्चाचा आढावाही त्‍यांनी यावेळी सादर केला.
यावेळी प्रा.सुरेश भोंगाडे, वर्धा नगरपरिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री.खोराटे, जिल्‍हा माहिती अधिकारी  अनिल गडेकर,शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीकांत सोनटक्‍के,क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, घनशाम वरारकर,सार्वजनिक बांधकाम,पोलीस आदी विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment