Saturday 30 June 2012

पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव पाठवा



राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार 2012
शारिरीक व मानसिकदृष्‍ट्या अपंगत्‍व असलेल्‍या मुलांच्‍या कल्‍याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता मानवी सेवा या उदात्‍त हेतूने सलग 10 वर्षे वैशिष्‍टपूर्ण व अव्दितिय असे काम करणा-या व्‍यक्‍तीस केंद्र शासनामार्फत रु. 1 लाख रोख व स्‍मृतीचिन्‍ह असा पुरस्‍कार देण्‍यात येतो.
राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार 2012
बाल कल्‍याणाचे क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थांना त्‍यांच्‍या कार्याचा गौरव म्‍हणून केंद्र शासनातर्फे राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो.व्‍यक्‍तीगत रु. 1 लाख रोख व स्‍मृतीचिन्‍ह असा पुरस्‍कार व संस्‍थासाठी रु. 3 लाख व स्‍मृतीचिन्‍ह
विशेष नैपुण्‍य पुरस्‍कार 2012
4 ते 15 वयोगटातील मुलांने शिक्षण,कला कार्य किंवा खेळामध्‍ये विशेष नैपुण्‍य दाखविणा-यास  केंद्र शासनामार्फत पुरस्‍कार देण्‍यात येतो.प्रथम पुरस्‍कारासाठी 20 हजार रोख व स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक व इतर 35 पुरस्‍कारासाठी चांदीचे पदक,स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि रु. 10 हजार रोख देण्‍यात येते.
राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार 2012
अपघातग्रस्‍त,संकटात सापडलेल्‍या व्‍यक्‍तीचा स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा न करता धाडसाने,शौर्याने जीव वाचविणा-या मुलांचा गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने केंद्र शासनामार्फत पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. पहिला क्रमांक सुवर्ण पदक,स्‍मृतीचिन्‍ह व रोख रक्‍कम ,दुसरा क्रमांक चांदीचे पदक,प्रमाणपत्र व रोख रक्‍कम व तिसरा क्रमांकास मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यन्‍त आर्थिक मदत असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. मुलांचे वय 6 ते 18 वर्ष या दरम्‍यानचे असावे. घटनेचा कालावधी 1 जुलै,2011 ते 30 जून,2012 हा असावा.
पुरस्‍काराकरीता प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. सदर पुरस्‍काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्‍या वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्‍ध आहे. तसेच राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार 2012 या पुरस्‍काराकरीता सुध्‍दा प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. पुरस्‍काराची नियमावली व विहीत अर्जाचा नमुना तसेच योजनेची माहिती शासनाचे वेबसाईट www.iccw.org वर उपलब्‍ध आहे.
वर्धा जिल्‍ह्यातील इच्‍दुक पात्र व्‍यक्‍ती,महिला, स्‍वयंसेवी संस्‍थांनी त्‍यांचे प्रस्‍ताव 7 जुलै,2012 पर्यन्‍त जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,आरती टॉकीज चौक, विद्यानगर,नागपूर रोड,वर्धा येथे सादर करावेत.अधिक माहितीसाठी जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्‍याशी संपर्क साधावा.
00000

No comments:

Post a Comment