Saturday 23 June 2012

संचिका पाठविण्‍याबाबत मुख्‍य सचिवांचे आवाहन




                          वर्धा दि.23-  दिनांक 21 जून,2012 रोजी मंत्रालयीन इमारतीला लागलेल्‍या आगीत सोबतच्‍या परिशिष्‍ट 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या विभागातील बहुतांश संचिका नष्‍ट  झालेल्‍या आहेत त्‍या संचिंकाची प्रामुख्‍याने 3 वर्गीकरणे आहे.
संचिका  1 - नागरीकांनी मंत्रालयात केलेल्‍या अर्जावरुन उदभालेली प्रकरणे  
संचिका 2 – राज्‍य शासनाच्‍या अधिनस्‍त कार्यालयाकडून प्राप्‍त झालेली प्रकरणे
संचिका 3 – केंद्र शासन,इतर कार्यालये किंवा मंत्रालयीन स्‍तरावर उदभलेली प्रकरणाची  पुर्नबांधणी करण्‍याबाबत उपाययोजना करावयाची असल्‍याने सदर्हू माहिती तातडीने पाठविण्‍यात यावी असे आवाहन राज्‍याचे मुख्‍य सचिव जयंतकुमार बॉंठीया यांनी केले आहे.
            संचिका 1 सर्व जिल्‍हाधिकारी यांनी स्‍थानिक रित्‍या प्रसिध्‍दी देवून अशा अर्ज केलेल्‍या नागरीकांना त्‍यांचे जवळ असलेल्‍या प्रकरणाची पोच, अर्जाची प्रत व सलग्‍न कागदपत्रो त्‍या तालुक्‍याच्‍या तहसील कार्यालयात जमा करण्‍यास आवाहन करावे. त्‍यासाठी सेतू सेवा केंद्रामध्‍ये विशिष्‍ट कक्ष उघडून प्राप्‍त प्रकरणासाठी पोच पावती घ्‍यावी.व अशी सर्व प्रकरणे त्‍या मंत्रालयीन विभागास तात्‍काळ पोहचवावी या कार्यपध्‍दतीसाठी परिशिष्‍ट 1 मधील कार्यालयाचा उल्‍लेख करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिध्‍दी द्यावी.
संचिका 2 –शासनातील ज्‍या अधिनस्‍त कार्यालयानी मंत्रालयात प्रकरणे पाठविली आहे व त्‍यावर निर्णय प्रलंबीत आहे.अशी प्रकरणे त्‍या मंत्रालयीन कार्यालयास परिशिष्‍ट 1 मध्‍ये विभागापुर्ती पाठवावी. अशी सर्व प्रकरणे पुढील 15 दिवसात पाठविण्‍यात आली आहेत याची शहानिशा सर्व शासकीय कार्यालयानी करावी व त्‍यावर संपूर्ण नियंत्रण त्‍या त्‍या जिल्‍हाधिका-यांनी ठेवावे.
संचिका 3- मंत्रालयीन विभागात जी प्रकरणे उदभवलेली आहेत त्‍यासाठी डीजेएमएस करुन माहिती घेवून आणि जेथे अशी माहिती ही नस्‍ट झाली आहे. त्‍या प्रत्‍येक कर्मचा-याकडून पुढील एका आठवड्यात अशा संचिका पुन्‍हा स्‍थापीत कराव्‍यात, त्‍यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून काही माहिती आवश्‍यक असल्‍यास ती पुढील एका आठवड्यात प्राप्‍त करुन घ्‍यावी.
संनियंत्रण ः प्रत्‍येक विभागाच्‍या सचिवांनी वरील कार्यपध्‍दतीप्रमाणे सर्व नस्‍ट संचिकाची पुर्नबांधणीची कार्यवाही पुढील एका मण्यिात पूर्ण करावी .  डीजेएमएस किंवा कर्मचा-याकडून प्राप्‍त माहितीच्‍या आधारे तीनही वर्गीकरणा-या किती संचिकाची पुर्नबांधनी  आवश्‍यक आहे.त्‍याचे उदिष्‍ट निचित करावे व त्‍याची सद्यास्थिती,त्‍याची क्षेत्रीय व मंत्रालयीन कार्यालयाकडून माहिती घेवून प्रत्‍येक आठवड्यात सामान्‍य प्रशासन विभागाला सादर करावी. असे जारी केलेल्‍या परिपत्रकात नमूद केले आहे.
0000


No comments:

Post a Comment