Tuesday 19 June 2012

वृक्षारोपण व संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार


·         31 ऑगष्‍ट पर्यन्‍त प्रस्‍ताव स्‍वीकारणार
·         वनश्री पुरस्‍कार आता शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार
·         राज्‍य विभागीय स्‍तरावर तसेच पुरस्‍कार

वर्धा दि.18 -  वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या संस्‍थाना  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात येणार आहे. राज्‍य व विभागीय स्‍तरावरील पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव 31 ऑगष्‍ट पर्यन्‍त उपसंचालक,सामाजिक वनीकरण विभागात स्विकारण्‍यात येणार आहेत.
          वनेत्‍तर क्षेत्रावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कामात कार्यरत असलेल्‍या व्‍यक्‍ती व संस्‍था यांचेकडून सन 2011 करीता छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव स्‍वीकारण्‍यात येणार आहेत.यापूर्वी हा वनश्री पुरस्‍कार 1988 पासून देवून गौरविण्‍यात येत होते.
         पुरस्‍कार विभागीय  स्‍तर आणि राज्‍यस्‍तर अशा दोन वेगवेगळया स्‍तरावर देण्‍यात येतात.व्‍यक्‍ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था, सेवाभावी संस्‍था, ग्राम विभाग अथवा जिल्‍हा अशा पाच वेगवेगळया संवर्गात पुरस्‍कार देण्‍यात येतात. विभागीय स्‍तरावर 2 पुरस्‍कार देण्‍याची तरतुद असून प्रथम पुरस्‍कार रुपये 25 हजार तर व्दितीय पुरस्‍कार 15 हजार आहे. राज्‍यस्‍तरावरील तीन पुरस्‍कार  असून प्रथम पुरस्‍कार 50 हजार रुपये व्दितीय पुरस्‍कार 40 हजार रुपये तर तृतीय पुरस्‍कार 30 हजार  रुपये असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.
        पुरस्‍कार मिळण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या  व्‍यक्‍ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था  व  सेवाभावी संस्‍था यांनी रोपवाटीका व रोपनिर्मितीचे काम केलेले असावे, त्‍यांनी शासकीय, सामुहिक अथवा खाजगी जमिनिवर सरपन,वैरण देणा-या झाडांची लागवड केलेली असावी. त्‍यांनी वृक्षलागवडीचे कार्यक्रमात ग्रामीण दुर्बल घटकांचा तसेच महिलांचा सहभाग घेतलेला असावा.त्‍यांनी वनीकरणाच्‍या माध्‍यमातून शाळकरी विद्यार्थी व महिला  यांचे कल्‍यानार्थ कार्य केलेले असावे,अपारंपारीक उर्जा स्‍त्रोतांचा वापर करणेसाठी जनतेला प्रोत्‍साहीत तसे प्रवृत्‍त करणारे त्‍यांचे काम असावे. वनीकरणाच्‍या संबंधात जनजागृती,प्रसिध्‍दी व प्रेरणा देणेबाबत सुध्‍दा काम त्‍यांनी केलेले असावे.
         वर्धा जिल्‍हयात वनेत्‍तर क्षेत्रात वृक्षारोपन आणि वृक्षसंवर्धनाच्‍या कार्यात दिनांक 31 डिसेंबर,2011 पर्यन्‍त मागील 3 वर्षापासून कार्यरत असणा-या आणि या पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यास इच्‍छुक असणा-या व्‍यक्‍ती,ग्रामपंचायत,शैक्षणिक संस्‍था व सेवाभावी संस्‍था यांनी जास्‍तीत जास्‍त संखेत प्रस्‍ताव सादर करावे असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक मिलींद बडगे यांनी केले आहे.     
परिपूर्ण प्रस्‍ताव  सादर करणेसाठी प्रस्‍तावाचा नमुना आणि त्‍या अनुषंगाने आवश्‍यक माहिती प्राप्‍त  करुन  घेण्‍यासाठी वर्धा जिल्‍हयातील व्‍यक्‍ती, शैक्षणिक संस्‍था,सेवाभावी संस्‍था, ग्रामपंचायत इत्‍यादिंनी उपसंचालक,सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचे बॅचलर रोड स्थित कार्यालय आणि तालुक्‍याचे मुख्‍यालयी असलेल्‍या लागवड अधिकारी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्‍ध आहेत.
                                                                0000     

No comments:

Post a Comment