Friday 22 June 2012

शेतक-यांच्‍या बांधावर खत 37 गावात 480 मेट्रीक टन खत वाटप


-         श्रीमती जयश्री भोज

वर्धा दि.22- शेतक-यांना मागणी नुसार आपल्‍या गावात खत उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या योजने अंतर्गत 47 शेतकरी गटांनी 480 मेट्रीक टन खताची उचल केली आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
          जिल्‍हयातील 37 गावामध्‍ये 689 शेतक-यांनी एकत्र येवून 47 गट स्‍थपन केले व शेतक-यांच्‍या  बांधावर खत योजनेचा लाभ घेतला आहे.शेतक-यांना या योजने अंतर्गत युरीया गोणी 271 रुपये डीएपी गोणी 937 रुपये 50 पैसे व वीस वीस शुन्‍य 764 रुपये 50 पैसे या दराने पुरविण्‍यात आली आहे.
वर्धा जिल्‍हयासाठी 5 हजार मेट्रीक टन खत संरक्षित साठयातुन मुक्‍त करण्‍यात आले असून शेतक-यांनी आपले गट स्‍थापन करुन या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
         खरीप हंगामापासून शेतक-यांच्‍या बांधावर खत वाटपाची योजना सुरु केली आहे.कृषी निगडीत महिला व पुरुष गट व जे शेतकरी गटात नाही परंतु 10-12 शेतकरी एकत्र आल्‍यास त्‍यांच्‍या समुहाला या योजनेत त्‍यांच्‍या शेतीच्‍या आकारानुसार बांधावर खत उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. गटांच्‍या प्रमुखाने आवश्‍यकता असलेल्‍या रासायनिक खताची मागणी आपल्‍या गावच्‍या कृषी सहाय्यका कडे  करावी.
          या योजने अंतर्गत पुरवठा करण्‍यात येत असलेले सध्‍याचे खत जुन्‍या संरक्षीत साठयातील असल्‍यामुळे शेतक-यांना बाजारभावा पेक्षा कमी दरातच बांधावर उपलब्‍ध होणार आहे, बांधावर खत उपलब्‍ध होणार असल्‍यामुळे जास्‍त दराने किंवा टिल्‍लू सोबत घेण्‍याच्‍या खाजगी दुकानदारापासून शेतक-यांची सुटका होईल. जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना व शेतकरी गटांना योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
                                                                00000           

No comments:

Post a Comment