Sunday 27 January 2013

समुद्रपुर येथील न्‍यायालयीन इमारतीचे उदृघाटन न्‍या. वासंती नाईक यांच्‍या हस्‍ते संपन्‍न न्‍याय व्‍यवस्‍थेची विश्‍वासर्हता जोपासावी न्‍याय व्‍यवस्‍थेची विश्‍वासर्हता जोपासावी



-          न्‍या. वासंती  नाईक
          वर्धा, दिनांक 27 –भारताच्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या वर्धापन दिनी समुद्रपूर येथे नव्‍याने बांधण्‍यात आलेल्‍या न्‍यायालयीन इमारतीचे उदघाटन मोठया थाटात काल मुंबई उच्‍च न्‍यालायाच्‍या नागपूर खंडपीढाच्‍या न्‍यायमुर्ती वासंती  नाईक यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.
           या कार्यक्रमाला प्रमुख जिल्‍हा व संत्र न्‍यायाधिश अशोक शिवनकर दिवानी न्‍यायाधीश कनिष्‍ठस्‍तर तथा दंडाधिकारी एस.पी.सैय्यद, तालूका अधिवक्‍ता संघाचे अध्‍यक्ष ए.एस.ढेकरे आदी  मान्‍यवर मंचावर उपस्थितीत होते.
            या प्रसंगी बोलतांना न्‍या. वासंती नाईक म्‍हणाल्‍या की भारतीय संविधानामध्‍ये दिलेले ब्रिद वाक्‍यानूसार सामाजिक समता , आर्थिक व राजनैनिक न्‍याय, तसेच विचार व अभिवेक्‍ती स्‍वांतत्र्याचा अवलंब आजही नयायालय करीत आहे. गरीब असो वा श्रीमंत प्रत्‍येकांना प्रामाणिकपणे न्‍याय देण्‍याची भुमिका न्‍यायालय  घेत असते. त्‍यामुळेच आजही सामान्‍य मानसाच्‍या मनामध्‍ये  न्‍याय व्‍यवस्‍थेवर आदर आणि विश्‍वास  आहे. न्‍याय मिळणे हा सर्वसामान्‍याचा हक्‍क असून न्‍यायाची प्रक्रीया गतीमान करण्‍याची गरज आहे. न्‍यालयात प्रकरणाचा निवाडा लवकर लागल्‍यास सामान्‍य लोकामध्‍ये न्‍याय  व्‍यवस्‍थेवरील विशवास अधिक दृढ होईल असेही  त्‍या म्‍हणाल्‍या.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना प्रमुख जिल्‍हा व संत्र न्‍यायाधिश अशोक शिवणकर म्‍हणाले की, समुद्रपूर तालुका निर्माण झाल्‍यानंतरही या तालुक्‍याचे कामकाज हिंगणघाट न्‍यायालयातून पाहण्‍यात येत होते. कालातराने समुद्रपूर न्‍यायालयाचे कामकाज समुद्रपूर येथून खाजगी इमारती मधुन चालत होते त्‍या  इमारतीमध्‍ये न्‍यायाधिश, अधिवक्‍ते,पक्षकार यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. आता मात्रसुसज्‍ज अशी  नविन इमारत झाल्‍यामूळे येथील येणा-या अडचणी दूर झाल्‍या आहे.   दोन हेक्‍टर क्षेत्रात या नविन वास्‍तू इमारतीच्‍या बांधकामासाठी  4 कोटी 94 लक्षरुपये खर्च झालेला असून ही वास्‍तू न समजता न्‍याय मंदीर समजून याचे पावित्र्य कायम ठेवावे असे आवाहन त्‍यांनी केले.
            तत्‍तपुर्वी न्‍यायमुर्ती नाईक यांनी दिपप्रज्‍वलीत करुन तसेच फित कापुन नविन नायालयीन इमारतीचे उदघाटन केले. तसेच त्‍यांच्‍या हस्‍ते न्‍यायालयातील परीसरात निसर्ग सेवा समितीच्‍या वतीने वृक्ष लावण्‍यात आले. यावेळी त्‍यांच्‍या शाल श्रीफळव पुष्‍प गुच्‍छ देवुन प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश शिवणकर यांनी सत्‍कार केला.
कार्यक्रमाचे संचलन अॅन्‍ड अर्चना वानखेडे व आभार अॅन्‍ड ए.एस.ढेकरे यांनी मानले यावेळी आमदार अशोक शिंदे ,तालुकास्‍तरावरील जिल्‍हयातील सर्व   न्‍यायाधिश अभियोक्‍ता, पक्षकार, सामान्‍य नागरीक  मोठया संख्‍येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment