Tuesday 29 January 2013

विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय परिवहन समितीचे गठण करणार - विजय चव्‍हाण



          वर्धा दि.29- शालेय विद्यार्थी  ये-जा करण्‍यासाठी आटो किंवा स्‍कुल बसने वापर करतात विद्यार्थ्‍यांना अपघात होवू नये यासाठी शासनाने आटो व स्‍कूल बससाठी एका परिपत्रकाव्‍दारे निर्देश जारी केलेले असून या निर्देशानुसार विद्यार्थ्‍यांच्‍या  सुरक्षित वाहतूकीसाठी जिल्‍हास्‍तरावर शालेय परिवहन समितीचे गठण करण्‍यात येणार असल्‍याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी आज दिली.
          पोलीस मुख्‍यालयाच्‍या आशिर्वाद सभागृहात आज शाळेचे मुख्‍याध्‍यापक/प्राचार्य, वाहतूक निरिक्षक, शिक्षण निरिक्षक, बसचे कत्राटदार व प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांची आढावा सभा संपन्‍न झाली त्‍यावेळी ते बोलत होत. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय यादजिरे,वाहतुक निरिक्षक शशिकांत भंडारे मंचावर उपस्थित होते.
         स्‍कूल बस व अॅटोच्‍या अपघातामध्‍ये शालेय विद्यार्थी जखमी किंवा प्रसंगी प्राण त्‍यागू नये यासाठी शासनाने गांभिर्यपूर्वक विचार केला असल्‍याचे नमूद करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्‍हाण म्‍हणाले की 3 फेब्रुवारी,2013 पासून अवैधरित्‍या चालविण्‍यात येत असलेल्‍या स्‍कूलबस अथवा अॅटोमध्‍ये क्षमतेनुसार वाहतूक होते अथवा नाही याची शहानिशा करण्‍यात येईल. तसेच ज्‍या  स्‍कूलबस व ऑटो नियमानुसार वाहतूक करणार नाही त्‍यांचेवर कडक कारवाई करण्‍यात येईल.प्रसंगी वाहतूकीच्‍या परवान्‍याचे निलंबनसुध्‍दा करण्‍यात येईल.विद्यार्थ्‍यांची सुरक्षित वाहतूक करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांचे  पालक, शाळेचे मुख्‍याध्‍यापक किंवा प्राचार्य , बसचालक,अॅटोचालक यांनी समन्‍वय ठेवण्‍याची गरज आहे. क्षमतेच्‍या अधिक शालेय विद्यार्थी बसणार नाही यासाठी वाहतूक विभागाकडून लक्षठेवण्‍यात येणार आहे.
          वाहतूक विभागाचे निरिक्षक प्रत्‍येक शाळेसमोर आकस्मिकरित्‍या उभे राहून विद्यार्थ्‍यांची सुरक्षित वाहतूकीबाबत खात्री करण्‍यात येईल. शासनाच्‍या निर्देशानुसार शालेय परिवहन समितीचे गठण करण्‍यात येणार असून त्‍या समितीचे अध्‍यक्ष, मुख्‍याध्‍यापक किंवा प्राचार्य सदस्‍य म्‍हणून पालक व शिक्षक संघटनेचा एक प्रतिनिधी, ज्‍या परिसरात शाळा असेल  त्‍या भागातील वाहतूक निरिक्षक,शिक्षण निरिक्षक, बस कंत्राटदार, किंवा त्‍यांचा प्रतिनिधी, स्‍थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी व सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक यांचा समावेश असेल. या समितीची बैठक तीन महिन्‍यातून एकदा घेण्‍यात येणार असून शाळेचे सत्र सुरु होण्‍यापूर्वी बैठकीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
          या समितीचे कर्तव्‍यामध्‍ये शालेय विद्यार्थ्‍यांची सुरक्षितता, ने-आण यावर देखरेख ठेवणे, परिवहन शुल्‍क आकारणेबाबत धोरण निश्चित करणे,स्‍कूलबस करीता भाडे निश्चित करणे, वाहनाच्‍या कागदपत्राची पडताळणी करणे अग्‍नीक्षमण  यंत्रणा वाहनामध्‍ये बसविल्‍याची खात्री करणे, वाहनामध्‍ये प्रथोमपचार आहे किंवा नाही याची खात्री करणे, आदि बाबींचा समावेश आहे. या निर्देशामुळे शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या वाहतूकीवर सकारात्‍मक परिणाम दिसून येवून भविष्‍यातील घडणा-या अपघाताला निश्चितच आळा बसेल असे त्‍यांनी सांगितले.
          यावेळी वाहतूक पोलीस निरिक्षक शशिकांत  भंडारे व उपशिक्षणाधिकारी  यादगीरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित संघटनेच्‍या  पदाधिका-यांनी शंकेचे निरासरन करुन घेतले.
          कार्यक्रमाचे संचालन व आभार वाहतू‍क निरिक्षक संजय पाटील यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक व पालक उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment