Wednesday 2 January 2013

अवघड शस्‍त्रक्रियेतून सरस्‍वतीला मिळाले नव‍जीवन वैद्यकीय क्षेत्रातील गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया


         वर्धा, दि.2 – जन्‍मापासून     फुप्फूसाच्‍या आजाराने ग्रस्‍त असलेल्‍या   गडचिरोली जिल्‍ह्यातील  अत्‍यंत दुर्गम ग्‍लास फोर्डपेठा (सिरोंचा) येथील दोन वर्षाच्‍या  कुमारी  सरस्‍वती  पोयाम कोनाम  या बालीकेवर  सेवाग्राम  कस्‍तुरबा रुग्‍णालयात यशस्‍वी  शस्‍त्रक्रिया करुन तीला नवजीवन मिळाले आहे.  
        कांझीमेंटल अॅडीनॉयल `सिस्‍टीक मॅलाफार्मेशन ऑफ लंक `Congemital Adevoid Cystce Malformation of leftlungg या दुर्धर आजारामुळे  ती जन्‍मापासूनच ग्रस्‍त  होती. अशा प्रकारचा आजार एक लक्ष रुग्‍णांमध्‍ये  अपवादाने  एखाद्यामध्‍ये  आढळतो.  दोन वर्षाच्‍या  लहान मुलीवर फुफ्फुसाची  अश्‍या  प्रकारची  यशस्‍वी शस्‍त्रक्रिया झालयाची   भारतीय वैद्यकीय क्षेत्रात अद्याप नोंद नाही.
        गडचिरोली जिल्‍ह्यातील सिरोंचा तालुक्‍याच्‍या  महाराष्‍ट्र आणि आंध्र प्रदेशच्‍या सीमेवरील  ग्‍लास फोर्ड पेठा  या  अल्‍पभुधारक  कुटूंबातील  पोचमकोनाम यांच्‍या  सरस्‍वती या मुलीला जन्‍मापासूनच ताप, सर्दी, खोकला  होता.  गावात तसेच  तालुकास्‍तरावर उपचार करुनही  सतत आजारी  असल्‍यामुळे  आंध्र प्रदेशातील मंचाल येथील  डॉक्‍टरांकडून  औषधोपचार करण्‍यात आले. शेवटी सेवाग्राम येथील  कस्‍तुरबा रुग्‍णालयात औषधोपचारासाठी  भरती केले असता या मुलीवर  अवघड शस्‍त्रक्रीया  आवश्‍यक असल्‍याचे  स्‍पष्‍ट झाले.   
         सेवाग्राम येथील  कस्‍तुरबा रुग्‍णालयातील  शल्‍यचिकित्‍सा  विभागाचे  प्रमुख डॉ. ए.पी. कांबळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली  डॉक्‍टरांच्‍या  चमुने तपासणी केली असता कंजनायटर सिस्‍टीक अॅडीनायल्‍ड मालफार्मेशन   हा फुफ्फुसानी श्‍वासनलीकेमधील रोग असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. एक्‍सरे, सीटीस्‍कॅन  आणि संपूर्ण  वैद्यकीय तपासणी नंतर  31  डिसेंबर रोजी  2 वर्षाच्‍या बालीकेवर  यशस्‍वी  शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. श्‍वासनलीका  फुफ्फुसातील पंच झालेला भाग बाहेर काढून टाकण्‍यात आला.  एक लाख लोकांमध्‍ये  एखाद्यालाच अशा प्रकारचा आजार होत असून, आपल्‍या  32 वर्षाच्‍या वैद्यकीय सेवेत प्रथमच  अशा प्रकारच्‍या   रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया  करण्‍यात आली असल्‍याची  माहिती यावेळी  डॉ. ए.टी. कांबळे यांनी दिली.
          दोन वर्षाच्‍या  काळात निकामी झालेले , फुफ्फुस   दुस-या भागावर विपरीत परिणाम करुन  पस  होत गेला. त्‍यामुळे श्‍वासनलीका आणि फुफ्फस यांचा विकास होत नव्‍हता. श्‍वसननलीका कमी विकसीत झाल्‍यामुळे  ते फुफ्फसाला जोडू शकली नाही. त्‍यामुळे हृदयावर कांप्रेशन तयार झाले.  निकामी झालेले , फुफ्फुस   काढून टाकण्‍यात आले. या मुलीवर  अत्‍यंत  गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया  यशस्‍वी  झालयानंतर   मुलीची प्रकृती  उत्‍तम  असून सेवाग्राम  येथील कस्‍तुरबा रुगणालयात अश्‍या प्रकारची पहीली शस्‍त्रक्रिया  यशस्‍वी  झाली आहे. शलयचिकित्‍सा  विभाग प्रमुख डॉ. ए.पी. कांबळे यांचेसह आनंद थवाईत, डॉ. कमलेश झारीया, डॉ. राबीन गुप्‍ता, डॉ. पुजा बत्रा आदींनी  ही अवघड शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली आहे.
     बाल शस्‍त्रक्रिया विभागातील  आयसीसीयु  मध्‍ये  कु.सरस्‍वती  सध्‍या  भरती  आहे.
     महात्‍मा गांधी इन्‍स्‍टीट्युट ऑ फ सायन्‍सेसच्‍या  कस्‍तुरबा रुग्‍णालयात  रुगणांवरील  उपचारासाठी  अत्‍यंत  आवश्‍यक असलेले मल्‍टीपॅरामीटर, पल्‍स अॅक्‍झीलेटर , ब्‍लडगेज अॅनालायझर, व्‍हेंटीलेटर इतयादी सुविधा असल्‍यामुळे  अशाप्रकारच्‍या गुंतागुंतीच्‍या शस्‍त्रक्रिया शक्‍य असल्‍याचे मतही शस्‍त्रक्रिया विभागाचे  प्रमुख डॉ. ए.टी. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
                                                  00000

No comments:

Post a Comment