Thursday 3 January 2013

महिलांनी स्‍वतामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करावा


                                                                                           जि. प. अध्‍यक्ष
            राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावीत्रीबाई यांच्‍या जयंती
          निमित्‍ताने जाणीव व जागृती अभीयानाला आजपासुन प्रारंभ
           
वर्धा, दि.3- समाजात महिलांकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन नकारात्‍मक असुन  नीतीमुल्‍याचाही –हास होत आहे. महिलांना अबला न समजता सबला समजण्‍यासाठी शासन महिलांच्‍या संरक्ष्‍णासाठी अनेक कायदे केले ते अमलातही आणले आहे. समाजातील पुरुष प्रधान संस्‍कृतीचा पगडा आजही महिलांवर दिसून येत असून ही परिस्थिती बदलण्‍या करीता महिलांनी स्‍वतामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करावा असे  आवाहन जि. प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
          राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जंयंती निमित्‍ताने आयोजित जाणीव व जागृती अभियानाचे उदृघाटन येथील विकास भवन येथे आज संपन्‍न झाले त्‍या प्रसंगी ते बोलत होते.
          मंचावर जि. प. मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, जि. प. महिला व बाल कल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे, जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुलसुंगे, प्रकल्‍प अधिकारी माहूर्ले, प्रा. शेख हाशम, माधुरी काळे, व श्‍याम भेंडे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          महिलांच्‍या प्रगतीसाठी राज्‍यशासन अर्थसंकल्‍पात भरीव तरतूद केली असून जिल्‍हा परिषदही त्‍यांच्‍या शेष फंडातून वेगळी तरतूद करीत असल्‍याची माहिती देवूर जि. प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, दिल्‍ली सारखी अप्रिय घटना घडू नये यासाठी महिलांनी स्‍वतामध्‍ये  आत्‍मविश्‍वास व आत्‍मबळ निर्माण करावा. पुरुषाप्रमाणे महिलांना समसमान अधिकार प्राप्‍त असल्‍याने महिलांनी स्‍वताला कमी समजु नये.
          या अभियानामध्‍ये महिलांनी आपल्‍या आरोग्‍याचे  प्रश्‍न निरक्षरता , जुन्‍या चालीरितींना झुगारुन स्‍वावलंबी बनण्‍यासाठी कसोशिने  प्रयत्‍न करावे. ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे कार्य सतत डोळयापूढे ठेवून त्‍याच्‍या आचार व विचाराचे अनूकरण करावे असेही ते म्‍हणाले.
          याप्रसंगी बोलतांना मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, महिलांच्‍या सर्वांगिन विकासासाठी गांव व शहर पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, व मदतनिस यांचा महत्‍वाचा वाटा आहे. महिलांच्‍या  आरोग्‍याचे प्रश्‍न असो की समाज विधायक कार्य असो  त्‍या  मोलाची मदत करीत असतात. महिलांच्‍या प्रगतीसाठी शासन प्रयत्‍नशिल असून त्‍यांच्‍यासाठी अनेक सकारात्‍मक कार्य सूरु आहे. महिलांना आत्‍मनिर्भर बनण्‍यासाठी शासन कायदे करीत असले तरी त्‍यांना त्‍यांच्‍या प्रश्‍नाविषयी चर्चा करुन त्‍याच्‍या मध्‍ये जाणीव व जागृती निर्माण करणे आवश्‍यक आहे. अत्‍यंत प्रतिकूल परिस्थ्तिीमध्‍ये ज्ञानज्‍योती सावीत्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. त्‍याच्‍या कार्यामुळे आज महिला पुरुषांच्‍या बरोबरीने प्रत्‍येक क्षेत्रामध्‍ये अग्रभागी आहे. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना चांगले संस्‍कार दिल्‍यामुळे त्‍यांनी लोकपयोगी व लोकहिताचे कार्य केले. त्‍यांनी त्‍यांच्‍या राज्‍यामध्‍ये महिलांविषयी गौरवशाली परंपरा जोपासली हे अभियान महिलांच्‍या स्‍वावलंबनासाठी महत्‍वपुर्ण ठरणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
          तत्‍पुर्वी या कार्यक्रमाचे  दिप प्रज्‍वलन करुन राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले याच्‍या जयंती निमित्‍य  जाणिव व जागृती अभियानाचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संपन्‍न्‍ झाले यावेळी प्रा. शेख हाशम यांनी मुलांच्‍या कायद्याविषयी तसेच माधूरी काळे यांनी महीला विषयी शासनाने केलेले कायद्याबाबत  याविषयी माहिती सांगीतली.
          या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मनिषा कुलसुंगे यांनी केले. संचलन नितीन गायकवाड व आभार प्रदर्शन मोहूर्ले यांनी मानले याप्रसंगी मोठया प्रमाणावर नागरीक उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment