Friday 25 January 2013

आजणसरा तिर्थक्षेत्राचा विकास करणार - राजेंद्र मुळक



                                    जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या 118 कोटी 20 लाख
                                     खर्चाचा प्रारुप आराखड्यास मंजुरी
          वर्धा दि.25- वर्धा जिल्‍ह्याच्‍या सर्वांगिण विकासाला दिशा देणारा जिल्‍हा नियोजन समितीच्‍या 118 कोटी 20 लाख रुपये खर्चाच्‍या 2013-14 या वर्षासाठीच्‍या  जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत मान्‍यता देण्‍यात आली.
            जिल्‍ह्यातील रस्‍ते,वीज, पिण्‍याचे पाणी, सिंचन सुविधा, जलसंधारणासह शेतक-यांच्‍या व सामान्‍य जनतेसाठीच्‍या वैयक्तिक लाभांच्‍या योजनांना जिल्‍हा वार्षिक योजनेत प्राधान्‍य देण्‍यात आले असून ग्रामपंचायतीसह नगरपालिकांच्‍या विकासासाठी अतिरिक्‍त निधी जिल्‍हा वार्षिक योजनेत ठेवण्‍यात आला असल्‍याची माहिती पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
            आजणसरा या तिर्थक्षेत्राच्‍या विकासासह रस्‍ता दुरुस्‍तीसाठी विशेष प्राधान्‍य देण्‍यात आले असून जिल्‍ह्यातील इतर 10 पर्यटनस्‍थळांच्‍या विकासासाठीही निधी उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार असून बोर प्रकल्‍प क्षेत्रात ईकोटूरिझम केंद्र स्‍थापन करण्‍यासाठी नाविण्‍यपूर्ण योजने अंतर्गत 27 कोटी रुपयांचा निधीही उपलब्‍ध करुण देण्‍यात आल्‍याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
            विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीच्‍या आढावा बैठकीस राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रंणजीत कांबळे ,खासदार दत्‍ता मेघे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार अशोकभाऊ शिंदे, दादारावजी केचे, जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, विशेष निमंत्रित शेखर शेंडे,सुनिल राऊत, शेषकुमार येरलेकर आदि उपस्थित होते.
          जिल्‍हा वार्षिक योजना 2013-14 च्‍या वार्षिक प्रारुप आराखड्यासाठी शासनाने 75 कोटी 23 लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली असून 42 कोटी 97 लाख रुपयांची अतिरिक्‍त मागणी करण्‍यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 31 कोटी 59 लाख 65 हजार रुपये खर्चाचा तर आदिवासी क्षेत्र बाह्य योजनेअंतर्गत  38 कोटी 13 लाख रुपयाचा प्रारुप आराखडा मंजुर करण्‍यात आला.
          जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत 63 कोटी 67 लाख 43 हजार रुपये प्राप्‍त झाले असून विविध यंत्रनांना 46 कोटी 50 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्‍यात आला असून जिल्‍ह्यातील विकास कामावर 36 कोटी 33 लाख 83 हजार खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी उपाय योजनेअंतर्गतही सरासरी 79 टक्‍के खर्च झाला आहे. यावेळी पुर्नविनीयोजन प्रस्‍तावासही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी मान्‍यता दिली.
            वर्धा येथे सुसज्‍ज नाट्य गृहाचे बांधकाम, चार आरोग्‍य केंद्रांची निर्मिती  व वर्धा शहरात नविन पोलीस स्‍टेशन बाबतही यावेळी चर्चा करण्‍यात आली.
            पोहणा येथील कृषी विभागाच्‍या 35 ऐकर शेतावरील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम तसेच येथील अवजारीगृहाबाबत आमदार अशोक शिंदे यांच्‍या तक्रारीनुसार जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी चौकशी करुण अहवाल सादर करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्‍या.
            जिल्‍हा परिषदेच्‍या तालुकास्‍तरावर व मोठ्या गावांमध्‍ये असलेल्‍या शाळांच्‍या क्रींडांगणावर विद्यार्थ्‍यासाठी क्रींडांगण विकास निधीमधून 7 लाख रुपयापर्यतचे अनुदान मिळविण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सूचना पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिल्‍यात जिल्‍ह्यात कोल्‍हापूरी बंधारे व साठवणूक बंधारे बांधतांना पाणीवापर संस्‍था स्‍थापन करुनच बंधा-यांच्‍या कामांना मंजुरी द्यावी तसेच जिल्‍ह्यातील बंधां-यांच्‍या सध्‍यास्थितीबाबत अहवाल सादर कराव्‍यात अशा सूचनाही यावेळी देण्‍यात आल्‍यात.
            आर्वी शहरात पावसाळ्यात पुरामुळे निर्माण झालेल्‍या परिस्थिती बाबत तात्‍काळ पूरनियंत्रणाचे कामे तात्‍काळ पूर्ण करावे अशा सूचनाही बैठकीत देण्‍यात आल्‍या.
            प्रारंभी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी स्‍वागत करुण जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या प्रारुप आराखड्याची माहिती तसेच यावर्षी झालेल्‍या खर्चाचा आढावाही बैठकीत सादर केला.
जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी विभानिहाय खर्चाची माहिती बैठकीत सादर केली. यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, आदिवासी विभागाचे प्रकल्‍प अधिकारी  गिरीश  सरोदे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment