Saturday 12 January 2013

अण्‍णासाहेब भिसीकर यांच्‍या निरामय जीवनाची शतकपूर्ती


       वर्धा दि.12- पूर्वीच्‍या प्रसिध्‍दी व आताच्‍या माहिती व जनसंपर्क विभागात उपसंचालक पदावरुन निवृत्‍त झाल्‍यानंतरही कॅन्‍सर रिलिफ सोसायटी,ग्राहक संरक्षण मंच आणि मुकबधीर विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासह सामाजिक कार्यात समरस झालेल्‍या मुकूंद प.ऊर्फ अण्‍णासाहेब भिसीकर यांनी निरामय जीवनाची शतकपूर्ती पूर्ण केली आहे. आज त्‍यांचा 101 वा वाढदिवस साजरा होत आहे.
तेव्‍हाच्‍या मध्‍य प्रांताच्‍या प्रशासनामध्‍ये व त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या प्रसिध्‍दी संचालनालयात  एक आदर्श प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून आपल्‍या कर्तव्‍याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिध्‍दी विभाग हा पूर्वी महसुल विभागात सौलग्‍न होता आणि वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍या इंग्रजीमध्‍ये अनुवादित करुण देण्‍याचे काम होते. 1937 मध्‍ये अनुवादक त्‍यानंतर सहाय्यक प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून अण्‍णासाहेब भिसीकर यांनी प्रसिध्‍दी विभागात आपल्‍या कामाची सुरुवात केली. कुटूंबकल्‍याण,आदिवासी विकास व लॉटरी सारखा विषय विशेष प्रसिध्‍दी मोहिमेच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या मनांवर बिंबवण्‍याचं त्‍यांनी या विभागात कार्यरत असतांना यशस्‍वीपणे पूर्ण केले. प्रसिध्‍दी मोहिम कशी राबवावी याचा आदर्श जनसंपर्क क्षेत्रात काम करणा-यासाठी मार्गदर्शकच आहे. अण्‍णासाहेब जानेवारी 1971 मध्‍ये प्रसिध्‍दी उपसंचालक म्‍हणून मुंबई मंत्रालयातून सेवानिवृत्‍त झाले.
अणासाहेब सेवानिवृत्‍तीनंतर विदर्भ कॅन्‍सर रिलिफ सोसायटीचे सलग पाच वर्ष सदस्‍य म्‍हणून तसेच ग्राहक संरक्षण समितीचे अध्‍यक्ष व त्‍यानंतर शंकर नगर मुकबधीर विद्यालयाचे उपाध्‍यक्ष म्‍हणूनही आपल्‍या कामातील वेगळी छाप निर्माण केली आहे.
          वयाची शंभरीपूर्ण केल्‍यानंतरही  सामाजिक कार्यासोबत आरोग्‍य विषयक मार्गदर्शनाचे काम अव्‍याहतपणे सुरु आहे. आज 13 जानेवारी रोजी त्‍यांच्‍या वयाला शंभर वर्ष पूर्ण होऊन 101 व्‍या वर्षात पर्दापण करीत आहे. निरामय जीवनाची शतकपूर्ती ही वृत्‍तपत्र क्षेत्रातील सर्वांसाठी महत्‍वपूर्ण घटना आहे.
00000

No comments:

Post a Comment