Sunday 6 January 2013

समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी माघ्‍यमांची गरज - डॉ.वेदप्रकाश मिश्रा


                                              वर्धा जिल्‍हा श्रमिक पत्रकार संघाच्‍या
                           चौथा स्‍तंभ पुरस्‍काराचे वितरण 
           वर्धा दि.6-पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन,आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असून समाजातील दुराव्‍यवस्‍थेवर आघात करण्‍यासाठी माध्‍यमांची महत्‍वाची भूमिका असल्‍याचे प्रतिपादन दत्‍ता मेघे आयुविज्ञान संस्‍थेचे प्र.कुलगुरु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.  
         विकासभवन येथे मराठी पत्रकार दिन तसेच बाळशास्‍त्री जांभेकर व्दिजन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्‍या जाणारा चौथा स्‍तंभ पुरस्‍कार समारंभ प्रमुख वक्‍ते म्‍हणून डॉ.मिश्रा बोलत होते.
          चौथा स्‍तंभ पुरस्‍कार हिंगणघाट  येथील समाजसेवक नामदेवराव  कठाणे यांना यावेळी प्रदान करण्‍यात आला. पुरस्‍कारामध्‍ये शाल,श्रीफळ,स्‍मृतिचिन्‍ह व पाच हजार रोख रुपयाचा समावेश आहे.
अध्‍यक्षस्‍थानी सेवाग्राम आश्रमचे अध्‍यक्ष अॅड मा.म.गडकरी होते तर प्रमुख पाहुणेम्‍हणून  शेतकरी नेते विजय जावंधीया, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे उपस्थित होते.  
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्‍हणाले की, समाजात प्रगल्‍पता निर्माण करण्‍याचे कार्य महत्‍वाचे आहे. श्रमिक पत्रकार संघाच्‍या वतीने करण्‍यात आलेला सत्‍कार हा उदारतेचा आणि मानवतेचा सत्‍कार आहे. विद्यमान परिस्थितीत चेतना निर्मितीचा बोध आज चिंतनाचा विषय झाला आहे. समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी चौथ्‍या स्‍तंभाची गरज आहे
पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असतात हे त्‍यांनी पटवून दिले. समाज सतप्रवृत्‍तीवर टिकूण आहे असे त्‍यांनी सांगितले समाज स्‍वार्थावर जगू शकत नाही त्‍याला परमार्थाची जोडही असावी लागते असे ते म्‍हणाले स्‍वतःला भुक लागली त्‍यासाठी अन्‍न मिळविणे ही प्रकृती आहे. दुस-याचे अन्‍न हिसकावणे ही विकृती तर स्‍वतःहा भुके राहून दुस-याला अन्‍न देणे ही संस्‍कृती असल्‍याचे ते म्‍हणाले.
 आपण वैद्यकीय शास्‍त्राचे अध्‍यापक असल्‍याने दुस-याचे दुःख आपण  घेवू शकत नाही ते आपल्‍याला चांगल्‍या प्रकारे ठावूक आहे. परंतु भावनेनी त्‍या गोष्‍टी समजून घ्‍याव्‍या लागतात. पत्रकार संघाने या गोष्‍टी समजून घेवून नामदेवराव कठाणे यांनी केलेल्‍या कामाच्‍या भावना समजून त्‍यांचा जो सत्‍कार केला ही बाब गौरवाची आहे असे सांगून नामदेवराव कठाणे यांच्‍या कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या.
 जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी पत्रकारासाठी   स्‍वर्गीय  शंकरराव चव्‍हाण पत्रकार कल्‍याण निधीची स्‍थापना करण्‍यात आली असून यामधून पत्राकारांना सहाय्य करण्‍याचे काम केल्‍या जाते या योजनेचा लाभ पत्रकारांनी घ्‍यावा असे आवाहन केले. वर्धेतील पत्रकार सकारात्‍मक बाजू मांडणारे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगून त्‍यांनी पत्रकार दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी यांनी महात्‍मा गांधी यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्‍याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन केले. तसेच हिंगणघाट येथील समाजसेवक नामदेवराव कठाणे यांचा केलेला सत्‍कार अभिमानाची बाब असल्‍याचे सांगितले. प्रास्‍ताविकातून प्रविण धोपटे यांनी चौथा स्‍तंभ पुरस्‍कारा मागील भूमिका विषद केली. संचालन आनंद इंगोले यांनी तर आभार चेतन कोवळे यांनी मानले.
कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर,पंकज भोयर, बुध्‍ददास मिरगे, प्रमोद गिरडकर,गुणवंत ठाकरे, आदिंची उपस्थिती होती.
00000

No comments:

Post a Comment