Wednesday 9 January 2013

सिंदी मेघे व पिंपळगांव येथे म्‍हाडाची योजना सूरु करणार




                                                              - सचिन अहिर
        वर्धा दि. 9 – भविष्‍यातील घरांची परिस्थिती बिकट होणार असून या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी वर्धा मालुक्‍यातील सिंदी मेघे व हिंगणघाट तालुक्‍यातील पिंपळगांव येथे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून लवकरच दोन ठिकाणी गृहनिर्माण योजना सूरु करण्‍यात येतील अशी माहिती गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्‍याय व पर्यावरण राज्‍यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.
     जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आज उद्योग, सामाजिक न्‍याय पर्यावरण व गृह निमार्ण विभागाच्‍या कामकाजाबाबत आढावा घेण्‍यात आला त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी एन नवीन सोना, निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाडे, उपजिल्‍हाधिकारी मेश्राम, अप्‍पर पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम, प्रकल्‍प अधिकारी बी.एम.मोहन, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, हरीष धार्मीक, समाजकल्‍याण  अधिकारी, जया राऊत, तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, नगर पालिका मुख्‍याधिकारी आदी मान्‍यवर उपस्थितीत होते.
            शहराच्‍या वाढत्‍या विस्‍तारीकरणामुळे तसेच लोकसख्‍यावाढीमूळे शहरा लगत असलेल्‍या ग्रामीण क्षेत्रामध्‍ये म्‍हाडाची योजना सुरू करण्‍याचा प्रस्‍ताव असल्‍याचे नमूद करून सामाजिक न्‍याय मंत्री सचित अहिर म्‍हणाले की, वर्धा तालूक्‍यातील मौजा सिंदीमेघे येथे सर्व्‍हे कमांक 159 व 160 मधील 8.40 हेक्‍टर आर जमीन व हिंगणघाट तालूक्‍यातील मौजा पिंपळगांव येथील सर्व्‍हे क्र.157/ , 165 ते 168 ,190 ते 192 मधील भुखंड म्‍हाडा योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मिळणार आहे. हया बाबतची प्रक्रीया सुरू झाली असून लवकरच या योजनेला मंजूरी प्रदान करण्‍यात येईल.
            सिंदीमेघे येथील जमिन मंजूरीसाठीच्‍या प्रस्‍तावावर कार्यवाही सूरु आहे. पिंपळगांव येथील प्रस्‍ताव 2008 मध्‍ये म्‍हाडाला सादर करण्‍यात आला होता.तथापी आता मात्र नव्‍याने सिध्र गणक मुल्‍यानूसार म्‍हाडाने महसूल खात्‍याकडे तातडीने रक्‍कम जमा करावी असे आदेश यावेळी त्‍यांनी दिले.
           यावेळी त्‍यांनी शिष्‍यवृत्‍ती व उद्योग विभागाचा आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र गौणखनन  रेती घाटासाठी आवश्‍यक असल्‍याचे सागून रेती घाट व गौण खणणाना बाबत असलेल्‍या आक्षेपाचे निराकरण मंत्रालय सतरावरून करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हाधिकारी सोना यांनी जिल्‍हयातील आधार कार्ड बाबतची माहिती देवून शाळा व महाविद्यालयातील शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍यासाठी कसोशीचे प्रयत्‍न सुरू असल्‍याचे सागून ते म्‍हणाले की, वर्धा जिल्‍हा हा आधार कार्डसाठी पायलट जिल्‍हा  घोषीत झाला आहे. शिष्‍यवृत्‍ती व जननी सुरक्षा योजना हया प्रामूख्‍याने राबवायचे असून जिल्‍हा समाज कल्‍याण विभागात  अपूरा कर्मचारी वर्ग असल्‍यामुळे शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍याचे कामे सुरळीत होण्‍यासाठी इतर जिल्‍हयायातून कर्मचारी वर्ग प्रतिनियुक्‍तीवर पाठविण्‍याची विनंती त्‍यांनी केली.
                             0000

No comments:

Post a Comment