Thursday 15 March 2012

येत्या 24 मार्चला जिल्ह्यात महसूल विभागाचे महाशिबीर

वर्धा, दि.15-महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍यात येत आहे. हे शिबीर 24 मार्च रोजी भरविण्यात येत आहे.
      जिल्‍ह्यात या योजनेची अमलबजावणी प्रभावीपणे करण्‍यात आलेली आहे. या अभियानाअंतर्गत आतापावेतो विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, प्रलंबित फेरफार, प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढणे अशी कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत.
    तालुकास्तरीय शिबीरात कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढल्‍या जाणार आहेत. जनतेला विविध दाखले शिबीरात उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील.
          तहसिल कार्यालय, वर्धा, तहसील कार्यालय, सेलू, तहसिल कार्यालय, देवळी, तहसिल कार्यालय, आष्‍टी, तहसील कार्यालय, आर्वी, तहसील कार्यालय, हिंगणघाट, तहसिल कार्यालय समुद्रपूर या सर्व तालुक्‍यातील नागरिकांचे अर्ज स्विकारण्‍याची अंतिम शेवटची तारीख 19 मार्च 2012 पर्यंत असून स्‍थळ संबधित तहसिल कार्यालय आहे. प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी शिबीर दि. 24 मार्च 2012 रोजी होणार आहे.
      जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी त्‍यांचया तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा व शिबिराचा लाभ घ्‍यावा. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.


000000

No comments:

Post a Comment