Thursday 15 March 2012

1 एप्रिल पासून फिरते नोंदणी पथक बंद

वर्धा, दि. 15- रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण या योजने अंतर्गत रोजगार वाहिनी वेब पोर्टलव्‍दारे उमेदवार व उद्योजक यांना दिल्‍या जाणा-या सेवा अधिक तत्‍पर, पारदर्शक व एकात्मिक संगणकीय पध्‍दतीने व अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सहजतेने मोठ्या प्रमाणावर शहरी, ग्रामीण स्‍तरापर्यंत पोहोचवून पात्र कौशल्‍यधारक व गरजू उमेदवारांचा डाटाबेस तयार करुन उद्योजकांना मागणीप्रमाणे चांगले मनुष्‍यबळ उपलब्‍ध करणे, आणि नोंदणी पदावरील उमेदवारांना रोजगाराच्‍या संधी उपलबध करुन देण्‍याच्‍या अनुषंगाने रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे.
      दि. 3 जानेवारी 2012 पासून संपूर्ण राज्‍यात महा-ई-सेवा केंद्रे, शासन मान्‍यता प्राप्‍त औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये मार्फत उमेदवारांना नांव नोंदणी, नुतनीकरण, नोंदणीचे अद्यावतीकरण व दुय्यम नोंदणीचे पत्र (क्ष-10) देणे तसेच नियोक्‍ते किंवा उद्योजकांना नवीन आस्‍थापना नोंदणी, ई.आर.1 व ई.आर.2 विवरणपत्रे सादर करणे इत्‍यादी सेवा उमेदवार किंवा उद्योजकांच्‍या शक्‍य तेवढ्या जवळ अंतरावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. ही बाब विचारात घेऊन तालुका स्‍तरावरील फिरते ग्रामीण नांव नोंदणी पथक दिनांक 1 एप्रिल 2012 पासून यापुढे बंद करण्‍यता येत आहे. असे सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा कळवितात.                               

No comments:

Post a Comment