रक्षा पेंशन अदालतीसाठीचा नमुना अर्ज
जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध
वर्धा,दि.06–
सातारा येथे पीसीडीए (पेंशन) इलाहाबाद यांच्यामार्फत रक्षा पेंशन अदालत एप्रिल
2016 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याकरीता आवश्यक असलेला विहिती नमुन्यातील
अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे उपलब्ध आहे. तरी ज्यांना पेंशन
संबंधित काही अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी सैनिक, विधवा,
अवलंबितांना करण्यात आले आहे.
माजी
सैनिक, विधवा, अवलंबितांना निवृत्ती वेतनाबाबत काही समस्या असल्यास त्यांनी विहित
नमुन्यातील अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांसह आशिष सेन, पेंशन अदालत अधिकारी, कार्यालय
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेंशन) द्रौपदी घाट, इलाहाबाद यांचेकडे द्वी प्रतीत
पाठविणे आवश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.
000000
00000
No comments:
Post a Comment