Tuesday 9 February 2016

आरोग्‍य सेवा हीच खरी देशसेवा
-         अंकित गोयल
Ø  रक्‍तदान,अपंग तपासणी,आयुष निदान व उपचार, आरोग्‍य शिबिराचे उद्घाटन  
       वर्धा,दि.9-आरोग्‍य सेवा हीच खरी देशसेवा,समाजसेवा आहे. या सेवेच्‍या माध्‍यमातून समाजाचे कल्‍याण होते.समाजाच्‍या कल्‍याणासाठी प्रत्‍येकाने निःस्‍वार्थ भावनेने शेवटच्‍या घटकापर्यंत आरोग्‍य सेवा पोहचेल याबाबत पुढाकार घ्‍यावा,असे आवाहन जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
             जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये महाआरोग्‍य अभियानांतर्गत आयोजित आयुष निदान व उपचार, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत आरोग्‍य शिबिर, रक्‍तदान शिबिर आणि अपंग तपासणी शिबिराच्‍या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी,अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.   दुर्योधन चव्‍हाण, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, अस्‍थीरोग तज्ञ डॉ. अनूपम हिवलेकर,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घेवडे यांची उपस्थिती होती.
             जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्‍हणाले, आरोग्‍य सेवा आणि पोलिस सेवा एकमेकांना पूरक असे कार्य करत असतात. या सेवेच्‍या माध्‍यमातून समाजाचे कल्‍याण होते. आरोग्‍य सेवा ही देशसेवा आहे. या सेवेचे व्रत  ज्‍यांनी अंगीकारले आहे त्‍यांचे नेहमीच कौतूक वाटते.तसेच ते कौतुकास पात्रही असतात, आहेत. त्‍यांच्‍या या व्रतामुळे अनेक तळागाळातील व्‍यक्‍तींपासून सर्वांचेच कल्‍याण होते, आयुष्‍य वाचते. प्रत्‍येकाला जीवनदान देण्‍याचे कार्य आरोग्‍य सेवेच्‍या माध्‍यमातून होत असते,असेही ते म्‍हणाले.
           जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी यांनी 1 फेब्रुवारीपासून महाआरोग्‍य अभियान जिल्‍हाभरात राबविण्‍यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्‍हणून आज रक्‍तदान तपासणी, अपंग तपासणी ,आयुष निदान व उपचार आणि राजीव गांधी योजनेंतर्गत आरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. महा आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातून गावापासून शहरातील विविध आरोग्‍य केंद्र, रुग्‍णालयात विविध आरोग्‍य सेवांचा लाभ जनतेला देण्‍यात येत आहे. या शिबिरांचा प्रत्‍येक गरजू, लाभार्थी व्‍यक्‍तींनी लाभ घ्‍यावा,असे  आवाहनही त्‍यांनी  केले.
        जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण यांनीही 13  मार्चपर्यंत चालणा-या महा आरोग्‍य अभियान शिबिराचा जनतेनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले. तसेच पोलिस आणि आरोग्‍य विभाग परस्‍परांना पूरक कार्य करणारे   असे विभाग असून देशाच्‍या सेवेत ते मोलाची भूमिका पार पाडत असतात,असे सांगितले.
          आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालयाचे डॉ. घेवडे यांनीही जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्‍यात येतो. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय सातत्‍याने रुग्‍णांच्‍या सेवेत उपलब्‍ध असून येथे कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्‍या कार्याचे कौतूक केले.
               आयुष विभागाच्‍या  डॉ. अश्विनी डोने यांनी राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानांतर्गत आयुष विभागात पारंपरिक चिकित्‍सा पद्धतीबाबत माहिती दिली. यामध्‍ये  आयुर्वेद, होमिओपॅथी ,युनानी, योग व निसर्गोपचार पंचकर्म व बिलतदबीर या अंतर्गत रोगनिदान व  उपचार याबाबतीत  माहिती देऊन जनतेने  या चिकित्‍सक पद्धतीचा उपयोग रुग्‍णांनी करावा, असे सांगितले.
         राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत विविध रुग्‍णांना या योजनेचा लाभ देण्‍यात येतो. जिल्‍ह्यातील 4 रुग्‍णालयामध्‍ये या योजनाचा लाभ देण्‍यात येत असून ही योजना पेपरलेस व कॅशलेस असल्‍याने शेतकरीवर्गासह सामान्‍य जनतेसाठी अत्‍यंत  उपयोगी असून 971 आजारांवर या योजनेंतर्गत उपचार करुन रोगाचे निदान निःशुल्‍क करण्‍यात येत असल्‍याचे योजनेचे जिल्‍हा समन्‍वयक डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
        प्रारंभी दीप प्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्रीमती मॅसन यांनी केले. आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांनी मानले. शिबिर उद्घाटनानंतर मान्‍यवरांनी आयुष निदान व उपचार  विभागाला भेट देऊन रुग्‍णांशी संवाद साधला. या कार्यक्रमास जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या पारिचारिका, वैद्यकीय अधिकारी, मेट्रन  श्रीमती पुनसे, डॉ. आकरे,  डॉ. रहाटे, जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                                        000000             
              
                  

                

No comments:

Post a Comment