Thursday 17 May 2012

मालमत्‍तावर हक्‍क सांगण्‍याची अधिसुचना जारी


  वर्धा,दि.17- पोलीस अधिक्षक, वर्धा यांचेमार्फत ठाणेदार, पोलीस स्‍टेशन,खरांगणा(मोरांगणा) यांनी दिलेल्‍या माहितीनुसार तथा मौजा खैरवाडा, ता.कारंजा, जि.वर्धा येथे सुरेश रामगीर गिरी, वय 55 वर्षे यांचे घराजवळ दिनांक 4 एप्रिल 2012 रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्‍यान अभिलाश तुकारामजी सलामे  व इतर 4 मजूर, सर्व रा. खैरवाडा हे उकींडा किंवा उकीरडा मोठा व खोल करण्‍याकरीता खड्डयाचे खोदकाम करीत असताना जमीनीत एक मडके टिकासीला लागून फुटल्‍याचे व त्‍यामधून एकूण 375 पांढ-या धातुचे पुरातन नाणी निघाल्‍याचे व ती नाणी सदर मजूरांनी आपले घरी नेल्‍याबाबतची माहिती गिरी यांचेकडून पोलीस स्‍टेशन, खरांगणा(मो.) ला मिळाली होती.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्‍थळी जावून नितेश मंगलराव परतेकी रा.खैरवाडा या ईसमांकडून 375 पांढ-या धातुचे पुरातन नाणी जप्‍त करुन सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने पोलीस स्‍टेंशनला आणून जमा केल्‍याचे व सदर मालमत्‍तेची विल्‍हेवाट लावण्‍याबाबत आदेश देण्‍याचे जिल्‍हाधिकारी  कार्यालयास कळविले आहे.
    त्‍याअनुषंगाने सदर अधिसूचना जारी करण्‍यात येत असून, ज्‍या कोणास सदर मालमत्‍तेबाबत हक्‍क सांगावयाचा असेल किंवा आपले म्‍हणणे मांडावयाचे असेल त्‍यांनी कार्यालयीन दिवशी आपले मत लिखीत स्‍वरुपात दिनांक 7 सप्‍टेंबर 2012 चे दुपारी 5 वाजेपावेतो स्‍वतः किंवा आपले प्रतिनिधी मार्फत जिल्‍हाधिकारी, वर्धा यांचेकडे सादर करावे. असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी जयश्री भोज यांनी कळविले आहे.
                        00000

No comments:

Post a Comment