Wednesday 16 May 2012

कृषि केंद्रांच्या तपासणी करीता नऊ भरारी पथके शेतक-यांनी टोल फ्री क्रमांकाचा लाभ द्या - जिल्हाधिकारी


      वर्धा,दि 1४ : खरीप हंगाम 2012 करीता जिल्ह्यातील शेतक-यांना नियोजनाप्रमाणे लागणा-या बियाणे व खते संपूर्ण जिलह्यात परवानाधारक कृषि केंद्रामार्फत व नोडल एजन्सी मार्फत कृषि विभाग उपलब्ध करुन देत आहे. शेतक-यांचीअडवणूक व फसवणूक होऊ नये तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी कृषि विभागात जिल्‍ह्यात कृषि केंद्राच्या तपासणीसाठी 9 भरारी पथके तयार करण्यांत आली असून शेतक-यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती जिलधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
खरीप हंगामाकरीता 4 लक्ष 10 हजार हेक्टर पेरणी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये कापूस 163000 हे, सोयाबिन 165000 हे, ज्वारी 5000 हे व इतर पिकांचा समावेश आहे. त्याकरिता कृषि खात्याकडे बी टी कापूस 7 लाख पॉकिटे, सोयाबिन 1.13 लाख क्विंटल व तूर 4.5 हजार क्विंटल व इतर पिकांच्या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.
खरीप हंगामाकरीता पेरणी नियोजनानुसार कृषी खात्याकडून 94300 मे टन रासायनिक खताचे मंजुर आवंटन प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये डीएपी 29900 मे टन, संयुक्त खत 18840 मे टन, युरीया 26810 मे टन, एम ओ पी 8370 मे टन खताचा समावेश आहे. मंजुर झालेल्या आवंटनानुसार खात्याकडून महिना निहाय पुरवठा होणार आहे. सदर पुरवठा हा तालुका निहाय वितरीत करण्यात येईल. सध्या स्थितीत रब्बी हंगामाचा शिल्लक धरुन 40000 मे टन खत जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. तसेच शेतक-यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याकरीता 18000 मे टन रासायनिक खताचा साठा संरक्षित करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या 10215 मे टन साठा संरक्षित आहे.
जिल्ह्यात कृषि निविष्ठा गुणनियंत्रणाकरीता व कृषि केंद्र तपासणी करण्याकरीता एकूण 9 भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावरील कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे.
चालू हंगामामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर कृषि निविष्ठा उपलब्धता व निविष्ठाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले  आहे. त्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्रमांक 07152-232449, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद 07152-242789 व पंचायत समिती वर्धा 07152-243232, देवळी 07158-254122, सेलू 07155-221240, आर्वी 07157-222048 आष्टी 07156-225657 कारंजा 07156-245831 हिंगणघाट 07153-244050 समुद्रपूर 07151-225434 तसेच शेतकरी बांधवाच्या अडीअडचणीची तात्काळ दखल घेण्याकरीता व त्याचे निराकरण होण्याकरीता टोल फ्री दुरध्वनी सुरु करण्यात आलेली आहे. त्याचा टोल फ्री 18002334000 व 07152-250099 क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क करावा. या करीता कोणतेही शुल्क लागणार नाही.
सर्व कृषि केंद्रावर टोल फ्री क्रमांक लावण्यात येणार आहे. याची शेतक-यांनी नोंद घ्यावी. शेतक-यांना कृषि निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कोणत्याही कृषि केंद्रातून जास्त दराने बियाणे अथवा रासायनिक खताची खरेदी करु नये. जास्त दराने विक्री करणा-या विक्रेत्यांची तक्रार वरील दिलेल्या कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात नोंदवावी.
तसेच शेतक-यांना कोणत्याही प्रकारचे बि टी कापूस वाणामध्ये कोणताही फरक नसल्याने शेतक-यांनी विनाकारण अपप्रचाराला बळी पडून एखाद्या विशिष्ठ वाणाचे बियाणे खरेदी करु नये. असे आवाहन जि.प.कृषि विकास अधिकारी, आर.के. गायकवाड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment