Friday 18 May 2012

टँकरव्‍दारे पाणी पुरवठ्यामुळे बोटोना वासियांना फार मोठा दिलासा


      वर्धा, दि.18-कारंजा तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयापासून वीस किलोमिटरवर  दुर्गम ठिकाणी असलेले बोटोने हे गांव कायमस्‍वरुपी टंचाईग्रस्‍त गाव म्‍हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावातील पाण्‍याचे स्‍त्रोत खोलवर गेल्‍यामुळे प्रखर उन्‍हात पाण्‍याची टंचाई निर्माण होत असते. पंचायत समितीच्‍या अंतर्गत असलेला एक टँकर तेरासे लोकसंख्‍या असलेल्‍या  बोटोना वासीयांची पाण्‍याची समस्‍या दूर करीत आहे.
     वर्धा जिल्‍ह्यात कारंजा हा तालुका टंचाईग्रस्‍त म्‍हणून ओळखला जात होता. अलीकडे मात्र शासनाच्‍या  विविध योजना प्रभावीपणे राबविण्‍यात येत असल्‍यामुळे कारंजा तालुक्‍यातील पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली आहे. कारंजा तालुक्‍यात 31 गावामध्‍ये टंचाई निवारण्‍यासाठी 40 उपाययोजना राबविण्‍याचा प्रस्‍ताव आहे त्‍यामध्‍ये 20 खाजगी विहरीचे अधिग्रहन, 4 टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, 10 ठिकाणी पाणी पुरवठ्याची विशेष दुरुस्‍ती. एका ठिकाणी तात्‍पुरती पुरक योजना , पाच ठिकाणी विंधन विहीरी घेण्‍याचा  याचा समावेश आहे.
     टँकरने पाणी पुरवठा करणा-या गावामध्‍ये बोटोना या गावाचा समावेश आहे. बोटोना हे गाव कारंजा ते आष्‍टी या रस्‍त्‍यावर आहे. या गावातील ग्रामसेवक एम.जे.तिवारी यांनी गावातील भौगोलीक परिस्थितीची माहिती देताना सांगितले की या गावामध्‍ये पावसाच्‍या पाण्‍यावर  विहरी भरल्‍या जातात. त्‍या विहीरीवर  ग्रामपंचायतीची स्‍वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. परंतू विहीरीतील पाणी आगस्‍ट ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत लोकांना नळाव्‍दारे  पाणीपुरवठा करण्‍यात येत असतो. पाण्‍याचे इतरत्र स्‍त्रोत  नसल्‍यामुळे बोटोना हे गाव कायमस्‍वरुपी पाणी टंचाईग्रस्‍त गांव  समजण्‍यात येते.
     शासनाच्‍या नारा 22 या योजनेमध्‍ये या गावाचा समावेश आहे. जोपर्यंत नारा 22 ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होणार नाही तो पर्यंत येथील ग्रामस्‍थांचा पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार नाही. नारा 22 योजने अंतर्गत दहा गावाची शिखर परिषद नुकतीच स्‍थापन करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी त्‍या शिखर परिषदेची मदत होईल.
     सद्या बोटाना वासियासाठी पंचायत समितीचा एक पाणीपुरवठ्याचा टँकर दिवसभरामध्‍ये चार वेळा पाणी भरुन विहिरीमध्‍ये खाली करतो. या विहीरतून ग्रामस्‍थ पाण्‍याची गरज भागवितात.  ही प्रक्रीया जानेवारी पासून सुरु होऊन जुलैच्‍या शेवट पर्यंत अखंडपणे सुरु राहते. हा काळ पाण्‍याची पातळी खोलवर जाणारा असतो.अनेक ग्रामस्‍थ पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी खाजगी विहरीवरुन बैलबंडीव्‍दारे ड्रम भरुन आणून पाण्‍याची गरज भागवित असतात.
     पाणी हे जीवन आहे या युक्‍तीनुसार शासन या गावाच्‍या पाणी पुरवठ्यासाठी विविध उपाय योजना करुन गावक-यांना पाण्‍याचा पुरवठा करुन दिलासा देण्‍याचे कार्य करीत आहे. भविष्‍यात मात्र नारा-22 योजना कायमस्‍वरुपी येाजना कार्यान्वित झाल्‍यास बोटोना येथील  पाण्‍याची समस्‍या नेहमीसाठी  सुटून ग्रामस्‍थामध्‍ये  आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.
                            00000

No comments:

Post a Comment