Thursday 10 May 2012

कारंजा येथील आदिवासी वसतीगृहात प्रवेश


     वर्धा,दि.10- जिल्‍ह्यातील कारंजा (घा.) येथे आदिवासी विकास विभागाव्‍दारे आदिवासी मुलींकरीता शासकीय वसतीगृह सुरु करण्‍यात आलेले आहे.सदर वसतीगृहात 8 व्‍या वर्गापासुन ते पुढील शिक्षण घेणा-या आदिवासी विद्यार्थिनींना वर्ग 8, वर्ग 11 वा व बी.अे. पार्ट-1 मध्‍ये प्रवेश देणे सुरु आहे. सदर वसतीगृहात भोजन व निवासाची मोफत व्‍यवस्‍था  असुन दरमहा निर्वाह भत्‍ता  देण्‍यात येतो. तसेच पाठ्यपुस्‍तके व शैक्षणिक साहित्‍य निःशुल्‍क पुरविण्‍यात येते.
    इच्‍छुक विद्यार्थिनींनी प्रवेश अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह भरुन आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत वसतीगृहाच्‍या कार्यालयात विनामुल्‍य  मिळतील. प्रवेश अर्ज वितरित करण्‍याची अंतिम तारीख निकाल लागल्‍यापासुन 15 दिवस असेल.अर्जासोबत गुणपत्रिकेची सत्‍यप्रत, शाळा सोडल्‍याचा दाखला सत्‍यप्रत, तहसिलदार यांचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र, शिकत असलेल्‍या  शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (ग्रामपंचायतचे) जोडावयाचे असल्‍याची माहिती गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, कारंजा घाडगे, जि. वर्धा कळवितात.

No comments:

Post a Comment