Monday 7 May 2012

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


       वर्धा, दि.7 – महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन यांचे मार्फत  MHT- CET-2012  प्रवेशासाठी चाचणी परीक्षा दि. 10 मे 2012 रेाजी यशवंत महाविद्यालय, वर्धा, जे.बी.सायन्‍स कॉलेज, वर्धा, जी.एस.कॉमर्स कॉलेज, वर्धा, सुशिल हिंमतसिंघका विद्यालय, वर्धा, न्‍यु ईंग्‍लीश हाय स्‍कूल, वर्धा, केसरीमल गर्ल्‍स हायस्‍कूल, वर्धा, भारत ज्ञान मंदीरम कॉन्‍व्‍हेंट, वर्धा, अग्रगामी हायस्‍कूल, वर्धा, डॉ.आर.जी.भोयर इन्‍स्‍टीट्युट ऑफ फॉर्म अॅण्‍ड रिसर्च, वर्धा, न्‍यु ईंग्लिश ज्‍युनिअर कॉलेज, वर्धा आणि लोक महाविद्यालय, वर्धा या परिक्षा केन्‍द्रावर घेण्‍यात येणार आहे.
     परिक्षा सुरळीतपणे पार पाडाव्‍या यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज  यांना प्राप्‍त अधिकारान्‍वये या परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू करण्‍यात आले असून दि.10 मे 2012 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत  परिक्षा केंद्राच्‍या 100 मिटर  परिसरात दोन किंवा त्‍या पेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्रीत येण्‍यावर प्रतिबंध करण्‍यात आले आहे. तसेच झेरॉक्‍स, फॅक्‍स, मोबाईल, फोन, र्इ-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतीबंध करण्‍यता आले आहे.
                              00000

No comments:

Post a Comment