Friday 4 May 2012

महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेच्‍या प्रभावी प्रसिध्दीसाठी पत्रकारांना पारीतोषिक 8 जुन पर्यंत अर्ज आमंत्रित


      वर्धा,दि.4 - राज्यात लोकहिताच्या अनेक योजनामधुन आर्थिक विकास व मानविजिवन मुल्य उंचावण्यासाठी सामाजिक शांतता व सुरक्षा आवश्यक असते.लहान सहान कारणावरुन निर्माण होणारे तंटे गाव पातळीवरुन समोपचाराने मिटवून भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत असे वातावरण निर्माण करुन लोकांनी स्थायी विकासाचा मार्ग स्विकारण्यासाठी पत्रकार व प्रसार माध्यमे आपली महत्वपुर्ण भुमिका बजावू शकतात.ही बाब लक्षात घेवून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रसिध्दी करण्यासाठी पत्रकारांना पारितोषीक जाहिर केले आहे.
जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कारासाठी रु 25 हजार, व्दितीय पुरस्कारासाठी रु 15 हजार व तृतीय पुरस्कारासाठी रुपये 10 हजाराचे पारितोषीक देण्यात येणार असून, विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार रु 1 लाख रुपये , व्दितीय पुरस्कारासाठी रु 75 हजार रुपये व तृतीय पुरस्कारासाठी रु 50 हजार रुपये , राज्यस्तर पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार रु 2 लाख रुपये , व्दितीय पुरस्कारासाठी 1 लाख 50 हजार रुपये व तृतीय पुरस्कारासाठी 1 लाख रुपयाचे पारितोषीक जाहिर करण्यात आले आहे. सदर पुरस्काराच्या पात्रतेसाठीच्या अटि पुढील प्रमाणे आहे.
1.      महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी दि. 2 मे 2011 ते 1 मे 2012 या कालावधीत प्रसिध्द केलले साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता मुल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
2.      पुरस्कारासाठी उक्त कालावधीत वृत्तपत्रे/ नियतकालीके यामधुन प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स, अशा साहित्याच्या विचार करण्यात येईल.
3.      पुरस्कारासाठी वृत्तपत्रे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील.
4.  पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्दी केलेल्या साहित्याच्या विचार करण्यात येईल,
5.      उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठी च अर्ज करता येईल.
6.      पारितोषीकासाठी विहित मुदतीत वैयक्तिक केलेले अर्ज विचारत घेण्यात येतील. एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबधित संपादक सबंधित समितीकडे पाठवतील. वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेले असेल तर त्यासबंधीत एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणतेही एक संपादक सबंधित समितीकडे पाठवतील.
7.      जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी सबंधित जिल्ह्यातुन प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे/नियतकालीके यांच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकारास सबंधित आवृत्तीत प्रसिध्द झालेल्या साहित्यासंदर्भात अर्ज करता येईल.
8.      माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांच्या मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ,ब,क वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिक यामधुन प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच वरील पारितोषिकांसाठी विचार करण्यात यईल.
9.      पुरस्कारासाठी गठित निवड समित्यातील सदस्य या स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाहीत.
   अर्जदारांनी विहीत नमुण्यातील आपला अर्ज तीन प्रतीत 8 जुन 2012 पर्यंत सादर करावयाचा आहे. 8 जून 2012 नंतर आलेले अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. जिल्हास्तरीय समिती प्राप्त अर्जासोबतच्या साहित्याचे निर्धारित निकष व द्यावयाचे गुण यानुसार परिक्षण करुन निकाल जाहिर करतील.
   सबंधित पत्रकारांनी दिनांक 2 मे 2011 ते दिनांक 1 मे 2012 या कालावधीत प्रसिध्द साहित्य, बातम्या, वृत्तांकन व फोटो फिचर, लेख अग्रलेख पांढ-या शुभ्र कागदावर चिकटवून त्यावर वृत्तापत्राचे नाव, प्रसिध्दी झाल्याचा दिनांक नमुद करावा. शिक्का व संपादकाच्या स्वाक्षरीने प्रमाणीत करुन आकर्षितरित्या बाईंडिंग करुन विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन वर्धा येथे 8 जुन 2012 पर्यंत सादर करण्यात यावे. सदर अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीपुढे ठेवण्यात येईल. परिक्षणानंतर जिल्हाधिकारी, वर्धा हे या स्पर्धेतील स्पर्धकांचे नावे जाहिर करतील. पुरस्काराच्या पात्रतेसाठीच्या अटीची पूर्तता करण्यांत यावी अन्यथा प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची स्पर्धेकांनी नोंद द्यावी.
   सदरहू मोहिमेच्या जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठया संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मिलींद आवळे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment