Wednesday 2 May 2012

जमिनी भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत करण्‍यासाठी विशेष मोहिम


       वर्धा,दि.2-राज्‍यात प्रामुख्‍याने विदर्भातील भुमिधारी शेतकयांच्‍या जमिनीबाबत अधिकार अभिलेखात सातबारा मध्‍ये भोगवटदार वर्ग दोन म्‍हणून नोंद दर्ज आहे. संबंधीत शेतक-यांना उक्‍त जमिनी विक्री, गहाण किंवा इतर कामासाठी ब-याच अडचणी निर्माण होतात. सदर जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग एक मध्‍ये रुपांतरीत करणेसाठी शासन परिपत्रक दि. 2 जानेवारी 2012 नुसार माहे एप्रिल ते जून 2012 या कालावधीत महसूल विभागाव्‍दारे विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे.
     शासनाव्‍दारे विविध योजने अंतर्गत मंजूर करण्‍यात आलेल्‍या जमिनी व्‍यतिरिक्‍त (काबीलकास्‍त, अतिक्रमण, सिलिंग, कुळवहीवाट, भुदान इत्‍यादी) या जमिनी वगळून भोगवटदार वर्ग 2 मध्‍ये धारण करीत असलेल्‍या जमिनी नियमानुसार आवश्‍यक कार्यवाही करुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केल्‍या जाऊ शकते. जिल्‍ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्‍यात येते की त्‍यांनी संबंधीत तालुक्‍याचे तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे. व विशेष मोहिमेचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात लाभ घ्‍यावा. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.
                         00000

No comments:

Post a Comment