Tuesday 1 May 2012

महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 52 वा वर्धापन दिन मोठया उत्‍साहात साजरा पालकमंत्र्याच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन



      वर्धा दि. 1 – महाराष्‍ट्रराज्‍य स्‍थापनेचा 52 वा वर्धापन दिन येथील क्रीडा संकुलनाच्‍या प्रागंणात मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यांत आला या निमित्‍ताने अर्थ व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी त्‍यांच्‍या शुभहस्‍ते आज सकाळी ध्‍वजारोहन करुन राष्‍ट्रध्‍वजाला मानवंदना दिली.
      या प्रसंगी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज व पोलीस अधिक्षक अविनाश कुमार आदी मान्‍यवर उपस्थित होते.
      या वेळी बोलतांना पालकमंत्री मुळक म्‍हणाले की महाराष्‍ट्र स्‍थापनेचा मंगल कलश 1 मे 1960 रोजी भारताचे तात्‍कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांना सन्‍मानपूर्वक दिला आणि  संयुक्‍त महाराष्‍ट्र अस्थित्‍वात आला. मात्र 106 हुतात्‍मांच्‍या बलिदानानंतर व त्‍यांच्‍या असिम त्‍यागातून हे राज्‍य निर्माण झाले. गेल्‍या 50 वर्षात राज्‍याने विविध क्षेत्रात नेत्रदिपक वाटचाल केली असून नैसर्गिक आपत्‍ती सारख्‍या संकटाचा व आव्‍हांनाचा सामना करुन राज्‍याने देशात अनेक क्षेत्रात आघाडी कायम ठेवली आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. राष्‍ट्रपिता माहात्‍मा गांधी, आचार्य विनोबा भावे महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या स्‍मृतीला अभिवादन करुन ते म्‍हणाले की, सेवाग्राम आश्रम येथे गांधी तत्‍वज्ञान तसेच स्‍वतंत्र चळवळीच्‍या इतिहासाच्‍या अभ्‍यास करण्‍यासाठी देश विदेशातील विद्यार्थी व पर्यटक मोठया प्रमाणावर भेटी देतात. त्‍यांच्‍या सोयी व सुविधांमध्‍ये वाढ करण्‍यासाठी मी सातत्‍याने प्रयत्‍नशील आहे असेही ते म्‍हणाले.
      यावेळी पोलीस पथकांनी बॅन्‍डवर राष्‍ट्रगिताची धून वाजवली. पोलीसदल व गृहरक्षक दलांतील जवानांच्‍या परेडचे निरीक्षन मंत्री महोदयांनी केले तसेच पोलीस व गृहरक्षक दलातील जवानांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली या प्रसंगी मंत्रीमहोदयांनी स्‍वातंत्र सौनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांची भेट घेवून त्‍यांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या सुभेच्‍छा दिल्‍या.
      याप्रसंगी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, नगर पालिका अध्‍यक्ष आकाश शेंडे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, न.प. आरोग्‍य सभापती प्रा.सिध्‍दार्थ बुटले, उपजिल्‍हाधिकारी आर.बी. खंजाची, जे.बी.संगितराव, नियोजन अधिकारी पी.एन.डावरे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार सुशांत बन्‍सोड, स्‍वातंत्र संग्राम सैनिक,जि.प.व न.प. चे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍याने उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ.अजय येते व ज्‍योती भगत यांनी केले यावेळी मोठया संख्‍येने लहान थोर मंडळी उपस्थित होती
000000.

No comments:

Post a Comment