Wednesday 2 May 2012

क्रीडा पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित


      वर्धा, दि. 2- राज्‍य शासनामार्फत राज्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडू, (साहसी व अपंग खेळाडूंसह) संघटक किंवा कार्यकर्ते व अपंग खेळाडू यांच्‍यासाठी शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार  क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्‍कृष्‍ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्‍कार महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्‍य क्रीडा पुरस्‍कार सन 2009-10 व 2010-11 या वर्षासाठी प्रदान करण्‍यात येणार आहेत.
    यासाठी मान्‍यता प्राप्‍त खेळांच्‍या अधिकृत राज्‍य संघटनेमार्फत त्‍या त्‍या आंतरराष्‍ट्रीय किंवा राष्‍ट्रीय स्‍तरावरील कनिष्‍ठ व वरिष्‍ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू कार्यकर्ते किंवा संघटक तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुन्‍यातील अर्ज संबंधित राज्‍य संघटनेचा ठराव शिफारशीसह दि. 31 मे 2012 पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्‍यवर्ती इमारत पुणे 1 या पत्‍यावर मागविण्‍यात येत आहेत. खेळाडू (साहसी व अपंग खेळाडू) किंवा मार्गदर्शकांस विहिती नमुन्‍यातील अर्ज वैयक्तिकरित्‍याही परस्‍पर  विहित तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करता येईल. क्रिडा संघटक किंवा कार्यकर्ते यांनी विहीत नमुन्‍यातील अर्ज संबंधित विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्‍या कार्यालयाकडे विहीत मुदतीत सादर करावेत.
      वरील सर्व क्रीडा पुरसकाराबाबत अधिक माहिती व नमुना अर्ज क्रीडा विभागाच्‍या www.mahasportal.gov.in या संकेतस्‍थळावर तसेच क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा अथवा संबंधित जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांच्‍या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा कळवितात.
                             000000
     

No comments:

Post a Comment