Wednesday 2 May 2012

प्राथमिक शाळांचे अनुदान पात्रतेसाठी मुल्‍यांकनाचा कार्यक्रम


     वर्धा,दि.2- जिल्‍ह्यातील कायम विना अनुदान तत्‍वावर परवानगी दिलेल्‍या प्राथमिक शाळांचे (इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळा वगळून) अनुदान पात्रतेसाठी मुल्‍यांकन करण्‍याकरीता कालबध्‍द कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.
     अनुदानासाठी इच्‍छुक शाळेने शासन निर्णयातील निकषानुसार स्‍वतःचे मुल्‍यमापन करावे. स्‍वयंमुल्‍यांकन प्रस्‍ताव इच्छुक शाळेने शासन निर्णयातील परिच्‍छेद 5 नुसार ऑनलाईन पध्‍दतीने दिनांक 5 मे 2012 पर्यंत सादर करणे. ऑनलाईन प्रणालीमार्फत संकेतस्‍थळावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करुन लोकांच्‍या दि. 5 मे 2012 ते 10 मे 2012 या कालावधीत हरकती मागविण्‍यात याव्‍या. शासन निर्णयानुसार निर्देश दिल्‍याप्रमाणे संकेतस्‍थळावर प्राप्‍त सर्व अर्जाची तपासणी शाळा मुल्‍यांकन दि. 5 मे 2012 ते 10 मे 2012 या कालावधीत समितीने करावे. शासन निर्णय निश्चित केलेल्‍या तपासणी समितीने मुल्‍यांकनासाठी प्राप्‍त झालेल्‍या एकूण अर्जापैकी 20 टक्‍के अर्ज दि. 10 मे 2012 ते 14 मे 2012 या कालावधीत केलेल्‍या कार्यपध्‍दतीने तपासणे. तपासणी समितीने आपल्‍या विभागातील मुल्‍याकनानंतर अनुदानासाठी पात्र शाळांची यादी शासनाकडे दि. 15 मे 2012 रोजी सादर करावी.
     मुल्‍यांकनाची माहिती www.mahdoesecondary.com   या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे. Online   माहिती भरणेपूर्वी  website   वरुन फॉर्मची हार्ड कॉपी  download   करुन प्रथम पेनाने भरावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. वर्धा कळवितात.
                         0000000      

No comments:

Post a Comment