Thursday 10 May 2012

2012-13 चे खरीप हंगामाचे नियोजन जिल्‍ह्यात 1 लाख 65 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबिनची लागवड


     वर्धा दि.10– वर्धा जिल्‍ह्यात कृषी विभागाने 2012-13 या वर्षाकरीता खरीप पिकाचे नियोजन केले असुन, जिल्‍ह्यामध्‍ये 1 लाख 65 हजार हेक्‍टर  क्षेत्रामध्‍ये सर्वाधिक सोयाबिन पिकाची लागवड करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
     जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात काल 2012-13 या वर्षाच्‍या खरीप हंगामाची आढावा बैठक त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
    यवेळी जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, कृषी अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, नाबार्डचे सहारूयक महाप्रबंधक स्‍नेहल बन्‍सोड, जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक एल.डी.डोंगरे, तालुका कृषि अधिकारी व संबधित अधिकारी उपस्थित होते.
     वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये 4 लक्ष 10 हजार 500 हेक्‍टर  जमीनीच्‍या क्षेत्रावर  लागवडीचे नियेाजन केले आहे त्‍यामध्‍ये कापसाची लागवड 1 लक्ष 63 हजार हेक्‍टर क्षेत्रावर,  सोयायिबनची 1 लक्ष 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावर, तुर 74 हजार 900 हेक्‍टर क्षेत्रावर, ज्‍वारी 5 हजार हेक्‍टर  क्षेत्रावर, भुईंमुंग 350 हेक्‍टर क्षेत्रावर , मुंग 900 हेक्‍टर  क्षेत्रावर , उडिद 725 हेक्‍टर क्षेत्रावर  व तीळ 625 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.
       आर्वी तालुक्‍यात 48 हजार 450 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 950 हेक्‍टर , कापूस 23 हजार हेक्‍टर , सोयाबिन 17 हजार हेक्‍टर , तुर 7 हजार 400 हेक्‍टर , मुंग 50 हेक्‍टर , उडिद 25 हेक्‍टर  , तीळ 25 हेक्‍टर क्षेत्राचा  समावेश आहे. कारंजा 42 हजार 500 हेक्‍टर क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये तालुक्‍यात  42 हजार 500 हेक्‍टर क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून,त्‍यामध्‍ये ज्‍वारी 1 हजार 300 हेक्‍टर , कापूस 7 हजार 200 हेक्‍टर , सोयाबिन 27 हजार 500, भुईमंग 200, तूर 6 हजार, मुंग 150, उडिद 100, तीळ 50 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. आष्‍टी तालुक्‍यात 29 हजार 800 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 250 हेक्‍टर , कापूस 13 हजार 400 हेक्‍टर , सोयाबिन 8 हजार 500 हेक्‍टर , भुईमुंग 50 हेक्‍टर, तुर 7 हजार 500 हेक्‍टर , मुंग व उडिद प्रत्‍येकी 50 हेक्‍टर क्ष्‍ेात्राचा समावेश आहे. वर्धा तालुकयात 54 हजार हेक्‍टर लागवड क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये ज्‍वारी 300 हेक्‍टर, कापूस 23 हजार 400 हेक्‍टर, सोयोबिन 20 हजार हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर , मुंग, तीळ व उडिद प्रत्‍येकी 100 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.सेलू तालुक्‍यात 44 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 700 हेक्‍टर , कापूस 20 हजार हेक्‍टर , सोयाबिन 13 हजार हेक्‍टर, भुईंमुंग 100 हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर , मुंग, उडिद व तीळ प्रत्‍येकी 100  हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. देवळी तालुक्‍यात  54 हजार 850 क्षेत्रावर लागवडीचे  नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 19 हजार हेक्‍टर, सोयाबिन 25 हजार हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर, मुंग 150 हेक्‍टर, उडिद व तीळ 100 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्‍यात  66 हजार 700 हेक्‍टर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 25 हजार हेक्‍टर , सोयाबिन 26 हजार हेक्‍टर , तूर 15 हजार, मुंग 100, उडिद व तीळ प्रत्‍येकी 50 हेक्‍टर क्षेत्राचा  समावेश आहे. समुद्रपूर तालुक्‍यात  70 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्‍यात आले असून, ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 32 हजार हेक्‍टर , सोयाबिन 28 हजार हेक्‍टर , तूर 9 हजार हेक्‍टर , मुंग, उडिद व तीळ प्रत्‍येकी 200 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले आहे.
               खरीप हंगामासाठी रासायनिक खते
     खरीप हंगाम 2012-13 खरीप हंगाम 2012-13 करीता रासायनिक खताचे खात्‍यामार्फत एकुण 94300 मे. टनाचे आवंटन मंजुर झाले असुन, त्‍यामध्‍ये युरीया 26810 मे.टन, डीएपी 29900 मे.टन, अेमओपी 8370 मे.टन, एसएसपी 10120 मे.टन, संयुक्‍त खत 18840 मे.टनाचा समावेश आहे. त्‍याचे तालुकानिहाय व ग्रेडनिहाय आवंटन करण्‍यात आले आहे. हंगामात पुरवठ्यासंदर्भात तुटवडा भासू नये म्‍हणून खात्‍याने 15294 मे.टन बफर साठा आवंटीत केला असून, त्‍यापैकी 10215 मे.टन साठा नियंत्रीत गोदामात शिल्‍लक आहे.अशी माहिती बैठकीत देण्‍यात आली.
                           000000   

No comments:

Post a Comment