Thursday 10 May 2012

व्‍यवसायीकांनी परवाना अथवा नोंदणी घेणे बंधनकारक


    वर्धा,दि.10-जिल्‍ह्यातील सर्व अन्‍न पदार्थ उत्‍पादक, विक्रेते, वितरक, हॉटेल,रेस्‍टारंट,पानपट्टीधारक, धाबेवाले, कॅटरर, फिरते विक्रेते, दुध विक्रेते, बेबीफुड व फुड सप्‍लीमेंट विक्रेते, मांस व मांस पदार्थ विक्रेते, अस्‍थायी स्‍टॉलधारक, फळ व भाजीपाला विक्रेते, घरगुती खानावळ व डब्‍बेवाले तसेच अन्‍न पदार्थ वाहतुक करणारे वाहतुकदार, सरकारी स्‍वस्‍त धान्‍य दुकान, शासकीय व निमशासकीय गोदाम, बचतगट व इतर अन्‍न व्‍यवसाय चालक  यांना दि. 5 ऑगस्‍ट 2011 पासुन संपुर्ण महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार त्‍याची अंमलबजावणी सुरु झालेली असून कलम 31 (1) व (2) नुसार सर्व अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक आहे.
     विना परवाना व्‍यवसाय करणे कलम 63 नुसार कायद्याने गुन्‍हा आहे व त्‍यांच्‍या विरुध्‍द न्‍यायालयीन कार्यवाही होऊ शकते. ज्‍या अन्‍न व्‍यावसायीकांनी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल अशा व्‍यावसायीकांनी दि. 4 ऑगस्‍ट 2012 पूर्वी कार्यालयात रितसर अर्ज करुन नवीन कायद्यानुसा पारवान्‍याचे परिवर्तन करुन घेणे बंधनकारक आहे. जर अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी दि. 4 ऑगस्‍ट 2012 पूवी्र अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आपल्‍या जून्‍या परवान्‍याचे परिवर्तन करुन घेतले नाही तर त्‍यांचा व्‍यवसाय विना परवाना गृहीत धरुन त्‍यांचेविरिफध्‍द तसेच विना परवाना व्‍यवसाय करणा-या अन्‍न व्‍यवसाय चालक विरुध्‍द कायदेशिर कार्यवाही करण्‍यात येईल. या कार्यालयामार्फत माहे मे व जुन 2012 मध्‍ये ग्रामीण भागात परवाना शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे परवाना अट क्र. 14 नुसार सर्व उत्‍पादक,आयातदार,वितरक  यांनी अन्‍न पदार्थ खरेदी व विक्रीचा व्‍यवहार हा कायद्यामध्‍ये दिलेल्‍या  बिलाचा मसुदा फार्म-ई नुसारच करावा व प्रत्‍येक बिलावर परवानाधारकाचा अथवा नोंदणीधारकाचा क्रमांक

नमुद असेल याची दक्षता घ्‍यावी तसेच आपण अन्‍न पदार्थाची खरेदी व विक्री करताना तो परवानाधारक किंवा नोंदणीधारक आहे व त्‍यांचा परवाना अथवा नोंदणीक्रमांक बिलावर नमुद आहे याची खातरजमा करावी.
      सर्व अन्‍न व्‍यवसायीकांनी सहायक आयुक्‍त यांचे कार्यालय, अन्‍न व औषध प्रशासन सुदामपुरी,आरती चौक, वर्धा येथे तत्‍परतेने नुतनीकरणाकरीता अथवा नविन परवान्‍याकरीता रितसर अर्ज करावा अथवा या प्रशासनातर्फे आयोजीत करण्‍यात असलेल्‍या  विविध तालुक्‍यातील शिबिरांमध्‍ये रितसर अर्ज करुन परवाना घ्‍यावा. अन्‍न व्‍यवसाय चालक यांना परवाना अथवा नोंदणीबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्‍यास कार्यालयीन दुरध्‍वनी क्र. 07152-243078 अथवा सहाय्यक आयुक्‍त (अन्‍न) चे दि..तु.संगत यांचा भ्रमणध्‍वनी क्र. 9867264888 वर संपर्क साधावा असे कळविले आहे.
                            0000  

No comments:

Post a Comment