Sunday 17 July 2016

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
शेतक-यांनी लाभ घ्‍यावा
                                    जिल्‍हाधिकारी- शैलेश नवाल
·       शेतक-यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे.

          वर्धा,दि.14- शासनाच्‍या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2016-17 मध्‍ये राज्‍य शासनाच्‍या वतीने  खरीप व रब्‍बी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्‍यात येत असून पीक विमा योजनेची मुदत  31 जुलै,2016  पर्यंत राहील. 1 ऑगस्‍ट,2016 नंतर मंजुर केलेल्‍या  पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही.
        शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्‍या लाभाकरिता 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी  त्‍यांचा अर्ज अपूर्ण असल्‍यास  विमा कंपनी त्‍यांचा अर्ज स्विकारणार नाही. त्‍याकरिता शेतक-यांनी  आपला विमा अर्ज भरण्‍याकरिता कृषी विभागाची मदत घ्‍यावी. बिगर कर्जदार शेतक-यांनी अर्जासोबत सातबारा व पटवा-याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे.
 शासनाने  निर्धारित केलेल्‍या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज  शेतक-यांच्‍या खात्‍यावर वळती केल्‍या जातील. शेतक-यांच्‍या पिकाच्‍या कर्जाची रक्‍कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतक-यांनी पी‍क विमा हप्‍ता भरण्‍यापूर्वीच्‍या पीकांचे नुकसान  ग्राह्य धरण्‍यात येणार नाही. पीक विमा दावा निपटान मध्‍ये सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या मदतीने होत असल्‍यामुळे ज्‍या पीकाची लागवड शेतीमध्‍ये करणार आहेत तेच पीक कर्ज घेतांना शेतक-यांनी अर्जामध्‍ये नमूद करावे.
ज्‍या शेतक-यांनी पीक कर्ज दोन किंवा अधिक बँकेकडून घेतले असल्‍यास त्‍यांचे पीक विमा एकाच बँकेचे ग्राह्य मानले जाईल.तरी जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व  अग्रणी जिल्‍हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे.



जिल्‍ह्यात खरीप ज्‍वारी, सोयाबीन, तूर, व कापूस या पिकांकरीता  तसेच खरीप भुईमुग पिकांकरीता. शेतक-यांनी जिल्‍ह्यातील  अधिसूचित तालुका अधिसुचित पिक व अधिसूचित मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास उपलब्‍ध आहे.
सन 2016-17 साठी  खरीप ज्‍वारी, 24 हजार, भुईमुग 30 हजार , सोयाबीन 36 हजार , तीळ 22 हजार मुग 18 हजार  , मका 25 हजार, उडिद 18 हजार ,  तूर 28 हजार  , कापुस 36 हजार प्रती  हेक्‍टर असे आहेत.
ाठविल्‍या भरलेला विम

पीक कर्ज पुनर्गठणची मुदत 31 जुलै पर्यंतच

सर्व पीक कर्ज धारक शेतकरी  ज्‍यांनी 2915-16 या आर्थीक वर्षात पीक कर्ज घेतले असेल व ज्‍यांनी यावर्षी परतफेड करुन नविन पीक कर्ज घेतले नसेल,  अशा सर्व शेतक-यांनी  आपले पीक कर्ज खरीप हंगाम 2015 पुनर्गठण करण्‍याकरिता सर्व  आवश्‍यक कागद पत्र घेऊन तात्‍काळ बँकेशी संपर्क साधावा व पीक कर्ज  पुनर्गठण करुन घ्‍यावे,  असे आवाहनही जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
                                                     00000




No comments:

Post a Comment