Wednesday 30 December 2015

महिला सरपंच असलेल्या प्रत्येक गावात
सुसज्ज ग्रामपंचायत भवन
सुधीर मुनगंटीवार
Ø जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा
Ø येत्या दोन वर्षात प्रत्येक गावात ग्रामपंचायत भवन
Ø 188 कोटी 45 लक्ष रुपयाच्या 16-17 चा प्रस्तावित आराखडा
Ø जिल्हा वार्षिक योजनेचा 67.65 टक्के खर्च
Ø विकासकामांसोबत खर्चाचा वेग वाढवा
        वर्धा, दिनांक 28 -  ग्रामीण जनतेला जलदगतीने सर्व सुविधा एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर अत्यावश्यक सुविधा असलेले आदर्श ग्रामपंचायत भवन येत्या दोन वर्षात बांधण्यात येणार असून जिल्ह्यातील महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने ग्रामपंचायत भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थ नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
        वर्धा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विकास भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये येत्या दोन वर्षात ग्रामपंचायत भवन बांधून महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरावा, या दृष्टीने ग्रामपंचायत भवन बांधकामाचे नियोजन कराअशा सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
            यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे,मितेश भांगडिया,जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी  संजय मीणा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे,जिल्हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे,निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य  उपसिथ्त होते.
             
                   जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च अखेर झालेल्या खर्चास तसेच नोव्हेंबर 2015 अखेर जिल्हयाला प्राप्त झालेल्या सर्वसाधारण योजना अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजनेवर 172 कोटी 81 लक्ष 97 हजार रूपये तरतूद प्राप्त झाली असून त्यापैकी 131 कोटी 79 लक्ष 46 हजार रूपये विकासकामांसाठी विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी 79 कोटी 16 लक्ष रुपये खर्च झाला असून जिल्ह्याची एकूण खर्चाची 67.65 टक्के आहे.विभागप्रमुखांनी उपलब्ध करून दिलेला निधी 31 मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक असल्यामुळे कामांचा तसेच खर्चाचा वेग वाढवा अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
            जिल्हा वार्षिक योजनेसाठी सर्वसाधारण योजनांवर 2016-17 या पुढील वर्षासाठी  विविध यंत्रणांकडून 188 कोटी 45 लक्ष 90 हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून मागील वर्षापेक्षा ही मागणी 100 कोटींनी जास्त आहे. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी यांचा जिल्हा असल्यामुळे हा जिल्हा आदर्श जिल्हा करण्याचा संकल्प असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, त्यांनी यावेळी सांगितले
            जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्मशान भूमी बांधण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यापूर्वी जिल्हृयातील यापूर्वी झालेल्या बांधकामाचा अहवाल छायाचित्रे एक महिन्यात सादर करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की वर्धा जिल्ह्याचे वैभव असलेल्या गवळाऊ या गायींचे संवर्धन करण्यासाठी तसेच दूर्मिळ होत असलेल्या प्रजातीच्या संवर्धनासाठी हेटीकुंडी येथील गाय संवर्धन प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी  यांनी एक महिन्यात प्रस्ताव तयार करावा. तसेच या गायींच्या चा-यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून 15 लक्ष रूपये तत्काळ मंजूर करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
पाणी पुरवठा योजनेवर श्वेत पत्रिका तयार करा
           जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणा-या सर्व योजनांचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टीने तसेच लोकसंख्येनुसार  पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने योजना व्यवहार्य आहे किंवा नाही तसेच प्रत्येक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो किंवा नाही या संदर्भात जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर श्वेतपत्रिका तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्यात.
              लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसदंर्भात तसेच काही भागात  दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता,पिण्याच्या पाण्याचे प्रदूषणांसंदर्भात पाण्याचे नमूने घेऊन दूषित पाणी असलेल्या ठिकाणी माहिती फलक लावा, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून पथदर्शी प्रकल्प तयार करा, अशी सूचना केली. तसेच चिंचोली ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी -टेंडर काढूनही योजनेची सुरूवात झाली नाही, यासंदर्भात जिल्हाधिकारी  यांनी 15दिवसांत चौकशी करावी दोषी असणा-या अधिकारी   कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.  
 जनतेला प्रशासनातर्फे मिळणा-या सुविधांसंदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले की सर्व अधिकारी  यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य असून कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, तसेच लोअर वर्धा प्रकल्पातील पुनर्वसित गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्धा शहरासभोवताली 11 गावातील भूखंडधारकांना बांधकाम परवानगी संदर्भात तत्कालीन उपविभागीय महसूल अधिकारी  पी.शीवशंकर यांनी तयार केलेल्या अहवालावर तत्काळ चौकशीप्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, प्रदूषणाबाबत बैठक घेणे, वर्धा जिल्ह्यासाठी 500 कोटी रूपयाचा विकास आराखडा तयार करणे, शेडगाव-शेगाव या रस्त्यासाठी 80 कोटी रूपये निधी उपलब्ध करून देऊन उत्त्म दर्जेदार रस्त्यांचे बांधकाम, वर्धा जिल्ह्यासाठी 25 कोटी रूपयांचा निधी तसेच सुसज्ज नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 20 कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून देतानाच सेवाग्राम विकास आराखडा आदीनिर्णय यावेळी घेण्यात आले.
               खासदार रामदास तडस यांनी देवळी पाणी पुरवठा योजनेस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून आमदार समीर कुणावार यांनी गाभा  गैर गाभा क्षेत्रात 100 टक्के तसेच अजनसरा बॅरेज प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी 11 गावातील परिसर विकास योजनेंतर्गत भूखंडधारकांना 21 दिवसांत बांधकामाची परवानगी देण्यात यावी, तसेच आमदार अमर काळे यांनी गवळाऊ गायींच्या संवर्धनासाठी हेटीकुंडी येथील फार्म तत्काळ सुरू करावा, इंदिरा आवास योजनेत निधी उपलब्ध करून द्यावा. स्पर्धा परीक्षेसाठी वर्धा,हिंगणघाट पुलगाव येथे अभ्यासिका लोअर वर्धा प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी आदी मागण्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केल्यात.
             प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेमध्ये झालेल्या विकासकामांसंदर्भात माहिती दिली. संचलन आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी केले

No comments:

Post a Comment